🛑जिल्हा बँकेत लवकरच ७३ लिपिकांची जम्बो भरती करणार – मनिष दळवी.
*🛑जिल्हा बँकेत लवकरच ७३ लिपिकांची जम्बो भरती करणार – मनिष दळवी.*
*🛑भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील स्थानिकांनाच प्राधान्य मिळणार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०३:-* जिल्हा बँकेत लवकरच ७३ लिपिकांची जम्बो भरती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या प्रकीयेत जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच त्यांना वर्षभरात कायम करून घेण्यात येणार आहे. २००८ नंतर प्रथमच ही भरती प्रक्रिया होत आहे, अशी घोषणा आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केली.
दरम्यान पहिल्या टप्प्यात ७३ तर दुसऱ्या टप्प्यात आणखी ७० पदे भरण्याचा आमचा मानस आहे. त्या संदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान ही प्रक्रिया राबवत असताना केंद्रीय स्तरावर काम करणाऱ्या आयबीपीएस या दर्जेदार कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणीही भूलथापांना बळी पडू नये, असेही त्यांनी सांगितले. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी ५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, म्हापस, पणजी व मडगाव ही परीक्षा केंद्रे राहणार आहे. त्यासाठी २१ ते ३८ अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. स्थानिक उमेदवार असल्यामुळे संबंधित उमेदवाराचे अधिवास प्रमाणपत्र त्याने उमेदवारी अर्ज सोबत अपलोड करणे बंधनकारक आहे. ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने केली जाणार आहे. स्थानिक उमेदवारांना संधी मिळावी आणि जिल्हा बँकेच्या ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न आहे त्यामुळे कोणीही भूलथापांना बळी पडू नये, असे दळवी म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

