कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी मोती तलावातील मगर अखेर जेरबंद.

*🛑सावंतवाडी मोती तलावातील मगर अखेर जेरबंद.*

 

*🛑सावंतवाडीकरांनी सोडला सुटकेचा श्वास.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* सावंतवाडीच्या मोती तलावात गेल्या पाच दिवसांपासून नागरिकांच्या भितीचं कारण ठरलेली मगर अखेर वनविभागाच्या जलद कृती दलाच्या सापळ्यात अडकली. साधारण पाच फूट लांबीची ही मगर रेस्क्यू करण्यात यश आले असून तिची वैद्यकीय तपासणी करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोती तलावातील मगर विसर्जनस्थळी संगीत कारंजाजवळ वारंवार दर्शन देत असल्याने वातावरण भयभीत होतं. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही मगर हाती लागत नव्हती. तब्बल दोन वेळा ती कारंजावर चढून आल्याने दहशत आणखीनच वाढली होती. अखेर उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल प्रमोद राणे, पथक प्रमुख बबन रेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आलं.

वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी सांगितलं की, “नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई आवश्यक होती. आज अखेर मगर पकडण्यात आली असून ही आमच्या टीमची ३६४ वी रेस्क्यू मोहिम ठरली आहे. पाणी जास्त असल्याने मोहिमेला विलंब झाला, मात्र अखेर ती सापळ्यात अडकली.”

या मोहिमेत बबन रेडकर, प्रथमेश गावडे, शुभम कळसुलकर, शुभम फाटक, पुंडलिक राऊळ, आनंद राणे, देवेंद्र परब, राकेश अमृसकर आदींचा सहभाग होता. मोहिमेच्या यशानंतर तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली व सुटकेचा श्वास सोडला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!