🛑 मळगाव येथील राऊळ व गावकर घराण्याचा गौरी पूजन व विसर्जन सोहळा उत्साहात
🛑 तब्बल एक हजार वर्षांची परंपरा
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ
🎴सावंतवाडी, दि-०२:- चक्क एक हजार वर्षाहूनही अधिक वर्षांची परंपरा असलेल्या मळगाव येथील देवस्थानचे मानकरी असलेल्या राऊळ (कुळ) व गावकर (थळ) घराण्यातील सौभाग्यवती महिलांचा एक दिवसीय गौरी पूजन, विसर्जन व व्हवसा कार्यक्रम आज गणेश चतुर्थीच्या सातव्या दिवशी परंपरेनुसार उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. सायंकाळी गौरीचे थाटात विसर्जन करण्यात आले. गौरी पूजनाची ही परंपरा ही दोन्ही घराणी एकोप्याने जोपासत आली आहेत.
गणेशोत्सवातील प्रत्येक घटकाला आपल वैशिष्ट्य आहे. गणेशोत्सवात जशी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते, त्याचप्रमाणे गौरी पूजनालाही वेगळ महत्व आहे. गौरी पूजन ही परंपरा कौटुंबिक ऐक्य, स्नेह व भक्तिभावाचे प्रतीक आहे. प्रत्येकाच्या परंपरेप्रमाणे गौरी देवी पूजनाचा कार्यक्रम एक, दोन व तीन दिवस चालतो. या पारंपरिक सोहळ्याचा वारसा तब्बल एक हजार वर्षांपासून मळगाव येथील राऊळ व गावकर घराण्यांनी जतन केला आहे. या दोन्ही घराण्यात एक दिवस गौरी पूजन व सायंकाळी गौरीचे विसर्जन केले जाते. यंदाही गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी राऊळ व गावकर घराण्यातील सौभाग्यवती महिलांचा एक दिवसीय गौरी पूजन कार्यक्रम आज पार पडला. सकाळी ढोलांच्या गजरात विहिरीवरून कुमारीका मुलीला घेऊन गौरीला थाटात दोन्ही ठिकाणी आणण्यात आले. त्यानंतर गौरीला नटवून पारंपरिक साडी परिधान करून देवीला अलंकार व फुलांनी सजविण्यात आले. नंतर तिचे पुरोहितांच्या उपस्थितीत विधिपूर्वक पूजन करण्यात आले. गौरी पूजनादरम्यान महिलांनी ‘व्हवसा’ देवीसमोर मांडून आपला व्हवसा भरण्याचा पारंपरिक विधी पार पाडला. यावेळी नवीन लग्न झालेल्या महिलांना पहिला मान दिला जातो. त्यानुसार नवोदित जोडप्यांचा व्हवसा भरणे कार्यक्रम प्रथम पार पडला. त्यानंतर उर्वरित महिलांचा व्हवसा भरणे कार्यक्रम झाला. सर्वांच्या उपस्थितीत महाआरती व गाऱ्हाणे पार पडले. त्यानंतर सर्व राऊळ घराण्यातील महिलांनी वाजतगाजत ढोलांच्या गजरात येथील गावकर घराण्यातील गौरीचे दर्शन घेतले, तर गावकर घराण्यातील महिलांनी राऊळ घराण्यातील गौरीचे दर्शन घेतले. नंतर परत आपापल्या ठिकाणी आल्यावर उपस्थित सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. त्यानंतर देवीसमोर महिलांनी विविध प्रकारच्या फुगड्या सादर केल्या. सायंकाळी पुन्हा एकदा ढोल-ताशांच्या गजरात व शंखनादात गौरीचे थाटात विसर्जन करण्यात आले. विसर्जनानंतर शेवग्याच्या पाल्याची भाजी व भाकरी असा प्रसाद उपस्थित सर्वांना वाटप करण्यात आला. त्यानंतर सामूहिक गाऱ्हाणे झाल्यावर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सोहळ्यात लहान मुलांपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. यामुळे हा सोहळा धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक उत्सवाचही दर्शन घडविणारा ठरला. अशी ही गौरी पूजनाची राऊळ व गावकर घराण्यांची एक हजार वर्षांची अखंड परंपरा आजही पूर्वापार श्रद्धेने चालू आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

