*ज्याच्या कार्यक्षेत्रातून ही दारू सप्लाय झाली त्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी निलंबित करावे
*विषारी दारूचा महापूर – मृत्यूचे दलाल ठरलेले सिंधुदुर्गातील अधिकारी!*
*ज्याच्या कार्यक्षेत्रातून ही दारू सप्लाय झाली त्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी निलंबित करावे*
सिंधुदुर्ग –
गोव्यातून महाराष्ट्रात विषारी दारूचा महापूर सतत वाहत आहे. काल राजापूर येथे पकडलेली तब्बल दोन कोटींची खेप याचे ताजे उदाहरण. एवढी मोठी रक्कम आणि एवढी मोठी खेप सिंधुदुर्गातील तपासणी नाक्यांवरून डोळ्याआड कशी काय गेली? हा प्रश्न जनतेच्या जिभेवर आहे.
*तपासणी नाकी लुटारू केंद्र*
सिंधुदुर्गातील बांदा, इन्सुली, खारेपाटण यांसारखी तपासणी नाके ही प्रत्यक्षात लुटीची बाजारपेठ बनली आहेत. अधिकारी तपासणी करत नाहीत; उलट दारू माफियांकडून हप्ता घेतात आणि गाड्या आरामात सोडतात. हे अधिकारी म्हणजे थेट मृत्यूचे दलाल! कारण त्यांच्या संगनमताने सिंधुदुर्गात शिरणारी ही दारू म्हणजे सरळ-सरळ विष आहे.
*गोव्यात फक्त १२ रुपयांना मिळणारा कॉटर, महाराष्ट्रात ५० रुपयांना* विकला जातो. पण पैशाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी खरा धोका आहे अल्कोहोलचे प्रमाण. जिथे २५-३० टक्के असायला हवे, तिथे या दारूमध्ये ९० टक्क्यांहून जास्त अल्कोहोल असते. म्हणजेच एका वर्षात या बाटल्या हजारो दारुड्यांचे लिव्हर फाडून टाकतात, आयुष्य गिळून टाकतात.आज प्रश्न दारू माफियांचा नाही, तर या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आहे.
हे अधिकारी म्हणजे लोणी खाणारे परजीवी. तपासणी नाक्यावर जनतेला अडवून खिसे फुगवायचे, पण गुन्हेगारांना हिरवा झेंडा द्यायचा – एवढेच त्यांचे काम उरले आहे.
समाजातील संस्था, प्रशासन, राजकीय यंत्रणा सगळेच मुकदर्शक आहेत. कारण त्यांच्याही खिशात या काळ्या पैशाचा उष्मा पोहोचतो. म्हणूनच जनता मरत आहे, पण अधिकारी लाच खाऊन जगत आहेत.
या मृत्यूच्या खेळावर फक्त माफियांवर छापे मारून थांबवता येणार नाही.
खरे जबाबदार हे अधिकारी आहेत. त्यांना त्वरित निलंबित करून कठोर शिक्षा झाली पाहिजे.भीतीमुळेच शिस्त येते. शिक्षा झाली तरच पुढचे अधिकारी थरथरतील. नाहीतर सिंधुदुर्ग जिल्हा पुढे जाऊन “दारू माफियांचा मक्का” म्हणूनच ओळखला जाईल.
*दारू दलाल झाले करोडपती.पिणारे लागले भिकेला व करून घेतला आयुष्याचा शेवट*
गोव्यातील ही विषारी दारू,गोवा बनावटी म्हणून प्रसिद्ध आहे,गोव्यात असे बनावटी दारूचे कारखाने आहेत,काही वर्षांपूर्वी गोवा सरकारने असे कारखाने उध्दवस्त केले होते,मात्र पुन्हा काही दिवसानी पुन्हा ये रे माझ्या मागल्या.एक वर्षांपूर्वी मुंबईहून आलेल्या दारु बदी अधिकाऱ्यांवर याच दारू माफियांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते पण त्या कारखान्यावर कारवाई मात्र कोणतीच झाली नाही हीच शोकांतिका आहे
गोव्यातील विषारी दारुचा महापूर बंद झाला नाही तर एके दिवशी सिंधुदुर्ग पर्यायाने सिंधुदुर्ग ओस पडायला वेळ लागणार नाही एवढे मात्र निश्चित, म्हणूनच म्हणतो म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतोय.

