🛑मळगाव येथील अष्टविनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने आगळा वेगळा उपक्रम.
*🛑मळगाव येथील अष्टविनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने आगळा वेगळा उपक्रम.*
*🛑अष्टविनायक प्रतिकृती दर्शन व शिवकालीन ऐतिहासिक वस्तू व गड किल्ले फोटो प्रदर्शन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* मळगाव येथील अष्टविनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने गणेशोत्सव सणाचे औचित्य साधून अष्टविनायक प्रतिकृती दर्शन व शिवकालीन ऐतिहासिक वस्तू व गड किल्ले फोटो प्रदर्शन हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. इतिहासप्रेमी ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी हा उपक्रम राबविण्यात आला.
यात मोरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरीजात्मक विघ्नेश्वर, महागणपती आदी अष्टविनायक प्रतिकृतींसोबत लोहगड, प्रतापगड, रायगड, राजगड, पन्हाळा, शिवनेरी, साल्हेर, सुवर्णगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी हे युनेस्को युनेस्कोच्या यादीत जागतिक वारसा म्हणून नामांकन प्राप्त झालेले महाराष्ट्रातील गड किल्ले तसेच वाघनखे, दांडपट्टा, मराठा धोप, कट्ट्यार आदी ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन मांडले होते.
याबाबत मंडळाला विचारले असता अष्टविनायक वरून मंडळाचे नाव असल्याने अष्टविनायक प्रतिकृती दर्शन व युनेस्कोच्या यादीत जागतिक वारसा म्हणून नामांकन प्राप्त झालेल्या महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती लोकांना व्हावी, म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला, असल्याचे अष्टविनायवक कला क्रीडा मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.
या उपक्रमाची संकल्पना मंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर राणे यांची असून मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास नाईक सदस्य-पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर, निलेश नाटेकर, सचिन सोनुर्लेकर, सिध्देश फेंन्द्रे, राजा राऊळ, प्रथमेश खडपकर, अथर्व धुरी, चैतन्य नाटेकर, तुषार राऊळ, नितीन राऊळ, प्रसाद नार्वेकर, शेखर राऊळ यांनीही उपक्रमासाठी सहकार्य केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

