🛑राजापूर येथे रत्नागिरी दारुबंदी शुल्क व मुंबई एक्साईज च्या कारवाईत दोन कोटीची दारु जप्त.
*🛑राजापूर येथे रत्नागिरी दारुबंदी शुल्क व मुंबई एक्साईज च्या कारवाईत दोन कोटीची दारु जप्त.*
*🛑सिंधुदुर्ग दारुबंदी खाते कुंभकर्णाच्या झोपेत तर तपासणी नाक्यावरील अधिकारी पैशात बुडाले.*
*🛑बांदा पोलिस निरीक्षक,व दारू बंदी उत्पादन शुल्क आधिक्षकांना निलंबित करुन भर चौकात सत्कार करायला हवा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* राजापूर -राजापूर येथे गोवा बनावटीची तब्बल दोन कोटींच्या आसपास किंमतीची दारू घेऊन जाणारा राजस्थान पासिंगचा कंटेनर जप्त करण्यात आला आहे. मुंबई एक्साईज आणि रत्नागिरी दारूबंदी शुल्क खात्याच्या संयुक्त कारवाईतून ही धडक मोहीम पार पडली असून त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या कंटेनरमधील दारू राजस्थान किंवा मध्यप्रदेशात पोहोचवली जाणार होती, असा प्राथमिक अंदाज आहे. कंटेनर चालकाला ताब्यात घेऊन मुद्देमाल व कंटेनर लांजा येथे तपासासाठी आणण्यात आला आहे.
*लाज वाटली पाहिजे!*
प्रश्न असा की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी झोपले होते का?
ज्या तपासणी नाक्यांतून हा कंटेनर गेला तेथे दारूऐवजी भ्रष्टाचाराचा माल चालतोय का? लाखोंचा माल त्यांच्या डोळ्यांआड कसा गेला? हे नुसते दुर्लक्ष नाही, हा थेट भ्रष्टाचाराचा खेळ आहे.
*जाब मागणारा जनतेचा आवाज*
बांदा पोलिस निरीक्षक व उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक – यांचा हारतुरे घालून सत्कार नाही, तर चौकात उभे करून जनतेसमोर प्रश्न विचारले पाहिजेत.जनाची नाही तर मनाची लाज असले तर तात्काळ या अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे.ज्या हद्दीतून हा माल गेला त्या नाक्यावरील सर्वांना जबाबदार धरून निलंबित केल्याशिवाय हा माफिया थांबणार नाही.
*संपादकीय टिपण्णी*
आज राजापूरमध्ये कंटेनर पकडला, उद्या पुन्हा दुसरा कंटेनर सरळ नाक्यावरून हसत निघून जाईल…
कारण यंत्रणाच भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतली आहे.
कोट्यवधींचा मुद्देमाल म्हणजे काही शेंगदाणे नाहीत की नाक्यावरून लक्षात आले नाही.
ही थेट संरक्षणाची व्यवस्था, वरपासून खालपर्यंत पोसलेला रॅकेट आहे.
*म्हणूनच आता जनतेला विचारायचं आहे*
“दारू माफियांचा रस्ता मोकळा करणारे अधिकारी, तुम्हाला जनतेची नाही तर मनाची तरी लाज आहे का?”
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

