कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑”मोरगावात माजी विद्यार्थ्यांचा उत्सव – शाळेच्या प्रगतीसाठी घेतला संकल्प”

*🛑”मोरगावात माजी विद्यार्थ्यांचा उत्सव – शाळेच्या प्रगतीसाठी घेतला संकल्प”*

 

*🛑जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मोरगाव क्र. १ व प्राथमिक शाळा मोरगाव गावठण यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴दोडामार्ग, दि- ०१:-* जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मोरगाव क्र. १ व प्राथमिक शाळा मोरगाव गावठण( ता.दोडामार्ग)यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला. दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित या मेळाव्याला माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक व मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या मेळाव्याचे अध्यक्षस्थान माननीय संतोषजी आईर, सरपंच मोरगाव यांनी भूषविले. तर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उदय ठाकूर आणि मोरगाव गावचे उपसरपंच तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य देविदास पिरणकर उपस्थित होते. सेवानिवृत्त कॅप्टन वामन नाईक, नंदलाल पिरणकर, सत्यवान नाईक, प्रमोद बांदेकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

मेळाव्याच्या प्रारंभी शाळेचे पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर सावंत यांनी प्रास्ताविकपर भाषणातून माजी विद्यार्थी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. त्यांनी शाळेतील उपक्रम व मिळवलेली यश, पालक व समाजप्रेमींचे सहकार्य, शिक्षकांविषयी कृतज्ञता, शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता, डिजिटल साक्षरतेचे महत्त्व, एआय तंत्रज्ञान व भविष्यातील आव्हानांचा परामर्श घेतला. तसेच माजी विद्यार्थ्यांकडून साधनसामग्री व आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

यानंतर माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील सुवर्णक्षणांची आठवण काढत आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मणिपाल राऊळ यांनी केले.

मेळावा यशस्वी करण्यासाठी उपशिक्षिका स्वाती पाटील, मुख्याध्यापक भिकाजी गावडे (प्रा. शाळा मोरगाव गावठण), मुख्याध्यापिका भाग्यश्री कुबल (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मोरगाव क्र. १), अंगणवाडी सेविका हेमा नाईक, संगीता कदम तसेच माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेवटी सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेचा लौकिक वाढविण्याचा संकल्प करून मेळाव्याची सांगता झाली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!