कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्ग व गोव्यातील युवक दुबई – शारजाह मध्ये राहून जपतात आपली रूढी परंपरा.

*🛑सिंधुदुर्ग व गोव्यातील युवक दुबई – शारजाह मध्ये राहून जपतात आपली रूढी परंपरा.*

 

*🛑तब्बल बारा वर्षे दरवर्षी करताहेत गणेशोत्सव उत्सव साजरा.*

 

*🛑परदेशी राहून सुद्धा करताहेत ,कोकणातील गणेशोत्सव उत्सवातील वातावरण निर्मिती.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २९:-* कोकणातील गणेशोत्सव हा महत्त्वाचा आणि उत्साहाने आनंदाने साजरा होणारा सण.

या गणेश चतुर्थी सणाच्या तयारीला आधीपासूनच सुरुवात होते. यात,प्रामुख्याने घरची साफसफाई , रंगरंगोटी, सजावट, गणेश मुर्ती शाळेत जाऊन मूर्तीची निवड करणे,आरती,भजन यांची तयारी करण्यात येते.

तर,सार्वजनिक ठिकाणी मंडप, हालते देखावे,संदेश देणारे हे देखावे, करण्यात युवा पिढी व्यस्त असते.त्याच प्रमाणे व्यवसायानिमित्त बाहेर गावी राहणारे कोकणी लोक गणेशोत्सवा साठी गावी परततात.

गणेशोत्सव कोकणामध्ये सामाजिक व धार्मिक दृष्ट्या महत्वाचा सण मानला जातो.या सणामुळे लोक एकत्र येतात.नातेसंबंध दृढ होतात. सामाजिक एकोप्याने लोक एकत्र राहतात.

गणेशोत्सव उत्सव म्हणजे कोकणातील “सांस्कृतिक आणि चाली रिती” जपण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.

आपल्या सिंधुदुर्गातील आणि गोव्यातील युवकांनी आपली रूढी परंपरा जपत ,गेली बारा वर्षे दुबई शारजाह येथे गणेश उत्सव सण मोठ्या जल्लोषात साजरा करत आहेत.

प्रथमच जेव्हा दुबई येथे,गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवलं तेव्हा शेखर मांजरेकर, नारेश मांजरेकर,देवानंद वॉलवोईकर, अजित शेठगावकर, सुरेश परब.,यांनी २०१२ पासून गणेशचतुर्थी साजरी करण्यास सुरुवात केली. पहिले दोन वर्ष फक्त गणेश पूजन करायचे .त्यानंतर जेव्हा आपल्याकडच्या युवकांची संख्या वाढली तेव्हापासून मग मोठ्याजल्लोषात मंडप, डेकोरेशन, महाप्रसाद ,आरती , भजन करण्यास सुरूवात झाली. वेगवेगळ्या परिसरात राहणारे सर्व युवक ,मित्रपरिवार या दिवशी मात्र एकत्र येऊन गणेशचतुर्थी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात.

तस पाहील तर गणेशोत्सव कोकणामध्ये धूमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र कामानिमित्त परदेशी राहणाऱ्यांना याचा आनंद घेता येत नाही.त्यामुळे सिंधुदुर्ग,गोव्यातील युवकांनी दुबई शारजाह येथे एकत्र येऊन गेली बारा वर्षे दरवर्षी गणेशोत्सव उत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करतात.

सर्वच युवक या ठिकाणी एकत्र येत,गणेश मूर्ती , सजावटी पासून, मूर्ती पूजन, नैवद्य,भजन, फुगड्या आदी कार्यक्रम मोठ्या थाटामाटात करतात आणि परदेशी राहून सुद्धा आपली रूढी परंपरा जपताना दिसतात.

मात्र, कामानिमित्त परदेशी राहणाऱ्यांना दर वेळी गावी येता येत नाही.अशावेळी,परदेशी राहणारे सिंधुदुर्गातील,गोव्यातील युवकांनी दुबई शारजाह मध्ये आपली रूढी परंपरा अबाधित राखण्यासाठी एकत्र येत गणेश चतुर्थी उत्सव सण साजरा करतात.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!