कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑’मविआ’चे आजचे आंदोलन स्थगित.

*🛑’मविआ’चे आजचे आंदोलन स्थगित.*

 

*🛑उबाठा शिवसेनेचे सतीश सावंत यांची माहिती.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २०:-* शासनाच्या विमा योजनेतील शेतकऱ्यांना विमा रक्कम न मिळाल्याने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, २० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलन छेडण्यात येणार होते. मात्र, कृषी अधीक्षक भाग्यश्री नाईकनवरे यांनी, सुमारे ६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २ कोटी ५९ लाखाची भरपाई जमा करण्यात आली असून उर्वरितांबाबत कार्यवाही सुरू असल्याचे पत्र दिल्याने २० रोजीचे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे. मात्र, पुढील कार्यवाही न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.

येथील विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले, श्रीमती नाईकनवरे यांनी कार्यवाही सुरू असल्याचे पत्र दिल्याने त्यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन स्थगित करीत आहोत. कृषी अधीक्षकांनी सांगितल्यानुसार, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करण्याची प्रक्रिया विमा कंपनीकडून सुरू आहे. आजअखेर जिल्ह्यातील ५५९० अर्जदार शेतकऱ्यांना रु. २ कोटी ५९ लाख रक्कम पोर्टलद्वारे वितरित करण्यात आली आहे. उर्वरित २६४१ शेतकऱ्यांना शासनाकडील अनुदान प्राप्त होताच वितरित करण्यात येईल.

सावंत म्हणाले, फळपीक विमा योजनेतील आंबा, काजू विम्याचे पैसेही त्वरित मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कृषी अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार आवश्यक निकष घोषित करून कार्यवाही करणे आवश्यक होते. मात्र, याबाबत ३० ऑगस्टपर्यंत कार्यवाही होईल. तसे न झाल्यास संबंधित विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे.

सावंत म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने हप्ता वेळेत न दिल्याने हे प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत. गणेशोत्सव काळात तरी शेतकऱ्यांना पैसे मिळावेत, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे २० ऑगस्टचे आंदोलन आम्ही स्थगित केले असले, तरी ३० ऑगस्टपर्यंत कार्यवाही न झाल्यास पूर्वसूचना न देता, आम्ही उग्र आंदोलन छेडू.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!