कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑चराठे ग्रा. पं. च्या कारभाराकडे बीडीओंचे लक्ष वेधणार!

*🛑चराठे ग्रा. पं. च्या कारभाराकडे बीडीओंचे लक्ष वेधणार!*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १९:-* बुधवारी झालेल्या चराठे ग्रामसभेत गोंधळ होऊन सरपंच प्रचिती कुबल यांच्या पतीने दादागिरी करत ग्रामसभा बंद पाडल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी केला असून,सरपंचांसह ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराबाबत सावंतवाडी गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. याबाबत अमित परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामसभेमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरू असताना अचानक गोंधळ सुरू झाला.त्यावेळी सरपंचांच्या पतीने सभेमध्ये हस्तक्षेप करत दादागिरी करुन सभा बंद पाडली. या प्रकारामुळे सभेला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

ग्रामसेवक विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत नसल्याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी मांडल्या.त्यामुळे गावातील विकासकामांवर परिणाम होत असून ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अविनाश जाधव, माजी पंचायत समिती सदस्य विश्राम कांबळे, शरद जाधव, विशाल कांबळे, श्रद्धा जाधव, स्वप्नील जाधव, दर्शन धुरी, महेश मसुरकर, तेजस चराठकर, विष्णू परब, दादू मसुरकर, मीनाक्षी जाधव, सुनील परब, सदा परब, ज्योती जाधव, मिलिंद उपरकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील परब, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!