आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 तब्बल वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर बंद असलेली चंदगड – दोडामार्ग – बेळगाव बससेवा पुन्हा सुरू ; प्रविण गवस व दत्ताराम देसाई यांच्या प्रयत्नांना यश

🛑 प्रवासी, शाळकरी विद्यार्थ्यांना दिलासा

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१९:- तब्बल वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर चंदगड-दोडामार्ग-बेळगाव बससेवा अखेर सुरू झाली असून प्रवासी, शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सेवेमुळे अनेकांचा प्रवास सुलभ होणार असून दैनंदिन ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

ही बससेवा सुरू करण्यासाठी सरपंच सेवा संघटना जिल्हाध्यक्ष प्रविण गवस व सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई यांनी सातत्याने चंदगड परिवहन विभागाशी पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.

सोमवारी (दि- १८)दुपारी ही बस मेढे येथे दाखल होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रविण गवस, उपसरपंच मायकल लोबो, दत्ताराम देसाई, स्वप्निल देसाई, सुरज गावस, भीमराव राणे, आनंद शेटकर, अजय सावंत सर, जनार्दन गवस, उदय गवस, सुनील सावंत, रामा गवस, संजय गवस, अमित गवस, आनंद वरक, सुहास सुतार, श्रेयस देसाई यांच्यासह शालेय विद्यार्थी, शिक्षकवर्ग, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बसचालक व वाहक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जनार्दन गवस यांनी श्रीफळ वाढवून बसचे पूजन केले. उपस्थित मान्यवरांनी प्रविण गवस यांच्या पाठपुराव्याचे कौतुक करत पुढील सामाजिक कामासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रविण गवस यांनी “आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झाले,” असे सांगत उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर बस प्रवासासाठी मार्गस्थ झाली.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!