कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑पडलेले मंगळसूत्र सुरक्षित परत — प्रल्हाद गावडे यांच्या प्रामाणिकपणाला नेमळेत सलाम.

*🛑पडलेले मंगळसूत्र सुरक्षित परत — प्रल्हाद गावडे यांच्या प्रामाणिकपणाला नेमळेत सलाम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴नेमळे, दि- १५:-* आकेरी गावडे वाडी येथील युवक प्रल्हाद गावडे यांच्या सतर्कता आणि प्रामाणिकपणामुळे नेमळे येथील एका महिलेचे हरवलेले मंगळसूत्र परत मिळाले. या प्रामाणिक कृत्याबद्दल नेमळे गावातून गावडे यांचे जोरदार कौतुक होत आहे.

घटनेची माहिती अशी की, गुरु पौर्णिमेच्या दिवशी नेमळे देऊळवाडी येथील भिकाजी (नाना) कलांगण आणि त्यांची पत्नी सीताबाई कलांगण हे सावंतवाडीवरून आकेरी मार्गे दुचाकीवरून घरी परतत होते. आकेरी येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात गाडी गेल्याने सौ. कलांगण यांच्या हातातील पर्स रस्त्यावर पडली, मात्र त्यांना याची जाणीव झाली नाही. घरी आल्यानंतर पर्स हरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शोध घेतली, परंतु पर्स सापडली नाही.

याच दरम्यान, त्यांच्या मागून येत असलेल्या प्रल्हाद गावडे यांना रस्त्यावर ती पर्स मिळाली. पर्स उघडून पाहिल्यावर त्यात मंगळसूत्र, आधारकार्ड, एटीएम कार्ड आदी मौल्यवान वस्तू होत्या. आधारकार्डवरील पत्त्यावरून संपर्क साधून त्यांनी पर्स कलांगण यांच्या घरी पोहोचवली. आपल्या सर्व वस्तू सुरक्षित परत मिळाल्याने कलांगण दाम्पत्यांनी गावडे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

प्रल्हाद गावडे यांच्या प्रामाणिकतेचा गौरव करण्यासाठी 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी नेमळे ग्रामपंचायत येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. ध्वजारोहण समारंभात सरपंच दीपिका भैरे आणि उपसरपंच सखाराम राऊळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी नेमळे गावातील ग्रामस्थ, शाळकरी मुले, शिक्षक, आरोग्य सेवक, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रा. शिक्षिका श्रेया परब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “प्रल्हाद गावडे यांचा आदर्श प्रत्येकाने जोपासावा. जीवनात प्रामाणिकपणा असेल तर तुम्ही कुठेही कमी पडणार नाही.”

नेमळे आणि परिसरात या घटनेची जोरदार चर्चा असून, प्रल्हाद गावडे हे तरुणाईसाठी प्रामाणिकपणाचे जिवंत उदाहरण ठरत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!