🛑 येत्या आठ दिवसात एम. एस.आर.डी.सी च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ती बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करू ; तहसीलदारांचे आश्वासन
🛑 आपण या प्रकरणात लक्ष घालून सदरची कारवाई करण्यास अधिकार्यांना भाग पाडू ; आमदार डॉ.निलेश राणे
🛑 उद्या होणारे सकल हिंदू समाज जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांचे उपोषण तात्पुरते स्थगित
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१४:- बेकायदेशीर मदरसा बांधकाम प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांना साटेली-भेडशी बाजारपेठेत उद्योग धंदे करण्यास बंदी घालावी असा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला होता.तसेच त्याचं व्यक्तींची साटेली-भेडशी गावातील बाजारपेठेत शासकीय जागेवर अतिक्रमण करून चालवण्यात येणारी दुकाने बंद करावी अशी मागणी करण्यात आली होती.या दुकानां विरोधात सकल हिंदू समाजाचे जिल्हा अध्यक्ष सीताराम गावडे यांनी १५ ऑगस्ट रोजी दोडामार्ग तहसीलदार कार्यालया समोर सकल हिंदू समाजाच्या वतीने बेमुदत उपोषण छेडले जाणार असल्याचे पत्र दोडामार्ग तहसीलदार यांना दिले होते. तसेच यासंदर्भात सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रशासनाला ठणकावून इशारा दिला होता की “देशद्रोही कृत्य करणाऱ्या संबंधितांची दुकाने आठ दिवसात जमीनदोस्त करा, अन्यथा आम्ही हिंदू समाज ते स्वतःहून हटवू. त्यातून उद्भवणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाला प्रशासन जबाबदार असेल,” असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्या नंतर प्रभारी तहसीलदार राजमाने मॅडम यांनी या निवेदनाची दखल घेत येत्या आठ दिवसात एम.एस.आर.डी.सी च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ती बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करू असे तहसीलदार यांनी आश्वासन दिले आहे.
तसेच कुडाळ मालवण चे आमदार डॉ. निलेश राणे यांनी आपण स्वतः या प्रकरणत लक्ष घालून सदरची कारवाई करण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडू असे आश्वासन कुडाळ मालवण चे आमदार डॉ निलेश राणे यांनी सकल हिंदू समाज जिल्हा अध्यक्ष सीताराम गावडे यांना आश्वासन दिले आहे.
त्यामुळे उद्या दोडामार्ग तहसीलदार कार्यालया समोर होणारे उपोषण तात्पुरते स्थगित केले असल्याचे सीताराम गावडे यांनी प्रसिध्द पत्रका द्वारे सांगितले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

