कोकणक्रीडाशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

बांद्याच्या प्रेरणाचा सुवर्ण मुकुट! जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत घवघवित यश*

*बांद्याच्या प्रेरणाचा सुवर्ण मुकुट! जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत घवघवित यश*

सिंधुदुर्गनगरी | सोमवार, दि. ४ ऑगस्ट सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत बांद्याच्या कु. प्रेरणा जय भोसले हिने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. क्रीडा संकुल, ओरोस येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
कणकवली, सावंतवाडी, आंबोली, मळगाव आणि बांदा येथील बॉक्सिंगपटूंमध्ये ही स्पर्धा रंगली. या सगळ्या स्पर्धकांमध्ये प्रेरणाने आपली चमकदार कामगिरी दाखवत जिल्हा पातळीवर आपले नाव अग्रस्थानी नोंदवले.
प्रेरणाला प्रशिक्षक किरण देसाई यांचे कुशल मार्गदर्शन लाभले असून, तिच्या या यशामुळे सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ती पत्रकार जय भोसले यांची कन्या असून, सध्या खेमराज हायस्कूल, बांदा येथे बारावीमध्ये शिकत आहे.
बांदा गावातही प्रेरणाच्या यशाचा उत्सव साजरा केला जात असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बॉक्सिंग क्षेत्रात हे यश एक प्रेरणास्त्रोत ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!