कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑प्रति महाबळेश्वर आंबोली आठ दिवस अंधारात;ग्रामपंचायतीच्या बेपर्वाईवर संदीप गवंडेंचा संताप.

*🛑प्रति महाबळेश्वर आंबोली आठ दिवस अंधारात;ग्रामपंचायतीच्या बेपर्वाईवर संदीप गवंडेंचा संताप.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴आंबोली, दि- २९:-* सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ‘प्रति महाबळेश्वर’ म्हणून ओळखली जाणारी आंबोली ही पर्यटन नगरी गेल्या आठ दिवसांपासून अंधारात असून, ग्रामपंचायतीच्या गलथान व बेभरोशी कारभारामुळे ही गंभीर अवस्था निर्माण झाली आहे. आंबोली मुख्य बाजारपेठ अंधारात असल्याने हॉटेल व्यवसायावर तसेच पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होत असून, याबाबत आंबोली येथील हॉटेल व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते संदीप गवंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील बाजारपेठेतील सर्वच पथदिप बंद अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे या बाजारपेठेतच ग्रामपंचायतचे सदस्य वास्तव्यास असूनही आठ दिवसांपासून मुख्य भागच अंधारात आहे. “जर बाजारपेठेची ही अवस्था असेल तर इतर भागांची काय दशा असेल?” असा सवाल उपस्थित करत गवंडे यांनी यासाठी सरपंच, उपसरपंच आणि संपूर्ण ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे ठणकावून सांगितले.

यापूर्वी ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती. त्यानंतर ती भाजपच्या ताब्यात दिली गेली. दिवंगत नेते बाळा पालयेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसाठी प्रयत्नपूर्वक मतदान केले. मात्र सध्याचे सदस्यही काहीच करत नसल्याचा आरोप गवंडे यांनी केला. “या नविन सदस्यांकडून काही तरी चांगले घडेल, अशी आशा होती, पण ती आशा निराशेत परिवर्तीत झाली आहे,” अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

गावात शुद्ध पाण्याचा टंचाईचा प्रश्न आहे, स्वच्छतेच्या बाबतीत ढिसाळपणा आहे, एकही योजना व्यवस्थित राबवली जात नाही. सदस्यांमध्ये कोणताही समन्वय नाही आणि गावातील समस्या दुर्लक्षित केल्या जात आहेत.

अंधारामुळे पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना बाजारपेठ आणि परिसरात प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. “हीच का ती प्रति महाबळेश्वर?” असा उपरोधिक सवाल पर्यटक विचारत असून गावाची प्रतिमा मलीन होत असल्याचे गवंडे यांनी नमूद केले.

या संपूर्ण प्रकाराबाबत गवंडे यांनी तक्रार खासदार नारायण राणे यांच्याकडे करण्याची तयारी दर्शवली आहे. “गावाचा विकास, पर्यटकांची सोय आणि स्थानिकांची सुरक्षितता याकडे ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!