सामर्थ्य, संयम आणि सेवा वृत्तीचा मूर्तिमंत अविष्कार ; संदीप एकनाथ गावडे
*🛑 सामर्थ्य, संयम आणि सेवा वृत्तीचा मूर्तिमंत अविष्कार ; संदीप एकनाथ गावडे
*🛑 वाढदिवस विशेष संपादकीय | सीताराम गावडे*
*🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*
*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-२९:-* सामान्य कुटुंबात जन्म घेऊन, आपली स्वप्नं डोळ्यात जपणारा आणि ती वास्तवात उतरवणारा एक कार्यकर्ता संदीप एकनाथ गावडे. आज त्यांचा वाढदिवस… आणि हा दिवस केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसाठी, विशेषत: आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघातील तरुण, महिला, शेतकरी व सामान्य कार्यकर्त्यांसाठी, प्रेरणेचा क्षण बनून उगवलेला आहे.
*सुरुवात डोंबिवलीतून, मूळ घट्ट कोकणात*
संदीप गावडे यांचा जन्म सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील फणसवडे गावात झाला. शिक्षणासाठी त्यांनी डोंबिवली गाठले. तेथे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी फायनान्समध्ये एमबीए पूर्ण केले. हाच काळ त्यांच्या जीवनाचा वळणबिंदू ठरला. डोंबिवलीचे लोकप्रिय नेते आणि तत्कालीन आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्व, विचारसरणी आणि कार्यपद्धतीने प्रभावित होऊन संदीप गावडे यांनी राजकारणाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.
*नेहमी पुढे, पण वळून पाहणारा नेता*
२०११ ते २०१४ या काळात त्यांनी आपल्या मूळ गावात येऊन भाजपच्या प्रचार यंत्रणेत सहभागी होत जनतेशी नाळ जोडली. पुढे २०१७ मध्ये पंचायत समिती निवडणुकीत विजय मिळवून, संदीप गावडे यांनी आपली क्षमता राजकारणाच्या मैदानात सिद्ध केली. त्यानंतर गावपातळीवरील अनेक ग्रामपंचायती भाजपच्या छत्राखाली आल्या. याचे श्रेय त्यांच्या संयम, संवादकौशल्य आणि संघटनशक्तीला जाते.
*तालुकाध्यक्ष ते सिंधुदुर्ग विस्तार*
भाजपच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यावर संदीप गावडे यांनी आंबोली, गेळे, चौकुळ, देवसू, केसरी, विलवडे अशा अनेक गावांमध्ये भाजपचा झेंडा प्रस्थापित केला. माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर संपूर्ण कोकणाची जबाबदारी आल्यावर, गावडे यांनीही आपल्या कार्याचा व्याप वाढवला. त्या कार्यातूनच त्यांना संपूर्ण मतदारसंघातील लोकांनी ‘खऱ्या अर्थाने काम करणारा नेता’ अशी ओळख दिली.
*कार्यकर्त्यांचा नेता, जनतेचा आधार*
आजही अनेक युवक कार्यकर्ते संदीप गावडे यांच्याभोवती आहेत, कारण ते कोणत्याही कार्यकर्त्याशी उंचीच्या भाषेत नाही, आपुलकीच्या भाषेत बोलतात. त्यांचं वक्तृत्व, संवादकौशल्य आणि मुद्देसूद मांडणी ही त्यांची ताकद आहे. प्रत्येक गावात कार्यकर्त्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि रोजगार देण्याची धडपड त्यांचं नेतृत्व वेगळं ठरवतं.
*शिक्षणासाठी समर्पित, समाजासाठी सजग*
वह्यांचे वाटप, स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा , चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत… या साऱ्या उपक्रमांनी संदीप गावडे यांचं सामाजिक भान प्रकर्षाने दिसून येतं. त्यांच्या दानशूरतेमुळे अनेक विद्यार्थी आज विनामूल्य शिक्षण घेऊ शकत आहेत.ग्रामीण भागातील एकही मूल शिक्षणा पासून वंचित राहता कमा नये यासाठी त्यांची धडपड असते व या विचारातूनच त्यांना स्कॉलरशिप चा विषय सुचला तो गरिब विद्यार्थ्यांचा तो तारणहार ठरला.
*काजू कारखाना आणि रोजगार निर्मितीचे मॉडेल*
फणसवडे गावात उभारलेला काजू प्रक्रिया उद्योग हा केवळ आर्थिक उपक्रम नव्हता, तर तो ग्रामिण भागातील महिलांसाठी आत्मनिर्भरतेचा नवप्रवास होता. आज त्या उद्योगातून ७० हून अधिक लोकांना रोजगार मिळतो, हे त्यांच्या दूरदृष्टीचं उत्तम उदाहरण.कुटुंबातील प्रत्येक महिला सक्षम व्हायला हवी,ती स्वतः च्या पायावर उभी राहयला हवी यासाठी गावडे यांची ती धडपड होती व ती प्रत्येक्षात उतरुन महिलांचे सबलीकरण झाले.
*योजना राबवण्यात कुशल, प्रश्नांवर ठाम*
गेल्या काही वर्षांत त्यांनी ओपन जिम, रस्ते, पाणी योजना, आरोग्य तपासणी, अशा असंख्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. गेळे गावच्या जमिन विषयक प्रश्नावर केलेले उपोषण हे त्यांच्यातील लढाऊ वृत्तीचं प्रतीक होतं. त्यांनी प्रशासनाच्या विरोधात उभं राहून लोकांचं हित साधलं.व ग्रामस्थांना त्यांच्या हक्काची जागा सातबारावर मिळाली.
*राजकारणात नवा अध्याय लिहिण्याच्या वाटेवर*
आज जिल्हा परिषद निवडणुकीत आपले नशीब आजमावण्याच्या तयारीत असलेले संदीप गावडे, केवळ एका मतदारसंघापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. त्यांच्या कामाचा व्याप संपूर्ण विधानसभा मतदारसंघात पसरलेला आहे.म्हणूनच मधल्या काळात संदिप गावडे विधानसभा निवडणुक लढवतात की काय अशी कुजबूज विरोधकांत सूरु होती,मात्र कोणत्याही निवडणूकी पेक्षा आपल्याला भाजपचे कमळ सर्वत्र पोहचणे गरजेचे आहे व त्यासाठी जे लागेल ते करायची आपली तयारी असल्याचे संदिप गावडे यांनी त्यावेळीच स्पष्ट केले होते.
*नेतृत्वाचा आदर्श नमुना*
संदीप गावडे यांच्यात संयम आहे, महत्वाकांक्षा आहे, चिकाटी आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकहितासाठी झपाटलेपण आहे. म्हणूनच मतदारसंघात अनेक ठिकाणी लोक प्रामाणिकपणे बोलतात “संदीप गावडे आमदार झाले, तर कोकणात नवा इतिहास घडेल.” कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल कडून संदीप एकनाथ गावडे यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!आपली कर्तृत्वगाथा अशीच पुढे वाढत जावी, आपल्या कार्यातून कोकणचा, सिंधुदुर्गाचा आणि जनतेच्या जीवनाचा विकास होत राहो, हीच सदिच्छा!!
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

