🛑कारीवडेचा शौर्यपुत्र सुभेदार मेजर संजय सावंत यांचा गावकऱ्यांच्या साक्षीने सन्मान; ‘ऑपरेशन सिंदूर’सह सैन्यातील ३० वर्षांच्या सेवेला सलाम!
*🛑कारीवडेचा शौर्यपुत्र सुभेदार मेजर संजय सावंत यांचा गावकऱ्यांच्या साक्षीने सन्मान; ‘ऑपरेशन सिंदूर’सह सैन्यातील ३० वर्षांच्या सेवेला सलाम!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २८:-* भारतीय सैन्यदलात ३० वर्षे सेवा करत अनेक आव्हानात्मक लढाया यशस्वीरित्या पार पाडणारे, आणि नुकत्याच ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये प्रभावी भूमिका बजावणारे कारीवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर संजय लक्ष्मण सावंत यांचा कारीवडे ग्रामपंचायत, कारीवडे पूर्व सैनिक संघटना आणि भैरववाडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या वेळी सुभेदार मेजर सावंत यांनी भावुक होत आपल्या मातृभूमी व गावासाठी केलेल्या कार्याचा गौरव सर्वांसमोर मांडला.
> “गेल्या ३० वर्षात सैन्यदलात अनेक महत्त्वाच्या ऑपरेशनमध्ये काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. मात्र माझ्या गावात, माझ्या माणसांच्या उपस्थितीत झालेला सत्कार हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे.”
— *सुभेदार मेजर संजय सावंत*
*शौर्य, समर्पण आणि सन्मान*
गेल्या काही वर्षांत कारगिल युद्ध (१९९९), ऑपरेशन पराक्रम (२००१-०२), सर्जिकल स्ट्राईक (२०१६), पुलवामा बालाकोट एअर स्ट्राईक, २०१९ टेरर अटॅक्स, तसेच अलीकडील २०२५ चे ‘ऑपरेशन सिंदूर’ या सर्व मोहिमांमध्ये भाग घेऊन संजय सावंत यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्याच्या युनिटने पाकिस्तानचे ४५ ड्रोन आणि २ क्षेपणास्त्र हल्ले हवेतच उध्वस्त करत निर्णायक भूमिका बजावली, अशी माहिती सर्पंच आरती माळकर यांनी दिली.
*राष्ट्र संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला गौरव*
युनिटच्या या कर्तबगारीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांची प्रशंसा केली. “तुम्ही मराठा आहात का?” असा प्रश्न विचारून “मराठा मरेगा, लेकीन हटेगा नहीं” अशा शब्दांत गौरव केला होता, अशी आठवण लक्ष्मण गवळी यांनी सांगितली. तसेच २०२१ मध्ये सेनाप्रमुखांकडून ‘शौर्य प्रमाणपत्र’ प्रदान करण्यात आले होते.
*कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग*
कार्यक्रमात सुभेदार मेजर संजय सावंत यांचे औक्षण करून, पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. ‘भारत माता की जय’, ‘जय शिवाजी!’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
उपस्थित मान्यवरांमध्ये –
सरपंच सौ. आरती माळकर, उपसरपंच तुकाराम आमुणेकर, ग्रामसेवक भरत बुंदे, तलाठी कु. सोनम शिरवलकर, हवालदार आत्माराम साईल, निवृत्त कॅप्टन लक्ष्मण सावंत, महेश गांवकर, नितिन गावडे, भिकाजी कवठणकर, सौ. तन्वी साईल, अरुणा सावंत, सेजल कारिवडेकर, प्रभा जाधव, भाजप उपाध्यक्ष अशोक माळकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रशांत राणे, सोसायटी उपाध्यक्ष रविंद्र ठाकूर, पोलीस पाटील प्रदीप केळुसकर, सौ. हर्षदा कारिवडेकर आदींचा समावेश होता.
*प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व – युवकांसाठी आदर्श*
> “संजय सावंत यांची राष्ट्रसेवा व शौर्य कोकणातील युवकांसाठी प्रेरणादायक आहे. अशा सुपुत्रांचा गावाला आणि देशाला अभिमान आहे.”
— *तुकाराम आमुणेकर*
*गावाचा गौरव – देशासाठी समर्पण*
संजय सावंत यांनी आपल्या गौरवाचे संपूर्ण श्रेय गावदेवता, कुटुंब, व कारीवडेवासीयांना दिले. त्यांनी आपली कर्तबगारी कारीवडे गावाला समर्पित केली.
*सूत्रसंचालन आणि सहभाग*:
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राथमिक शिक्षक श्री. राऊळ यांनी केले. पूर्व सैनिक, ग्रामस्थ, महिला बचत गट, आरोग्य सेविका, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

