कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑अज्ञात वाहनाच्या धडकेत कुडाळ येथील दुचाकीचालक गंभीर.

*🛑अज्ञात वाहनाच्या धडकेत कुडाळ येथील दुचाकीचालक गंभीर.*

 

*🛑झाराप-पत्रादेवी बायपासवर मळगाव-बादेवाडी येथील घटना.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २६:-* मुंबई गोवा महामार्गावरील झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव-बादेवाडी येथे गोवा येथून कुडाळ येथे जात असताना दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ओहोळालगत असलेल्या खाईत कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला आहे. राकेश महादेव साळुंखे (२९, रा. माड्याचीवाडी, कुडाळ) असे जखमीचे नाव असून ही घटना आज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

अपघातावेळी त्याच्या पाठीमागून येणारे मळगाव रेडकरवाडी येथील दुचाकीस्वार श्यामसुंदर सातार्डेकर यांनी त्याला खाली पडल्याचे पाहिले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना त्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ संजय जोशी, बबन नाईक यांनी खाली उतरून त्याला सुखरूपपणेवर काढले. यावेळी मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, स्थानिक ग्रामस्थ दीपक जोशी, बाबू गावकर, शैलेंद्र पेडणेकर, गोट्या नाईक, प्रथमेश मांजरेकर, शामू जोशी, शिवम जोशी, बंडया मांजरेकर, झिलू गावकर, गणेश जोशी, श्यामसुंदर सातार्डेकर यांनीही मदत कार्यात सहभाग घेतला.

याबाबतची खबर मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी सावंतवाडी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क केला. मात्र, रुग्णवाहिका वेळेत दाखल न झाल्याने अखेर खाजगी वाहनातून जखमीला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दार दाखल करण्यात आले.

झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव बादेवाडी येथे पुलावर डांबरीकरण करण्यात आले आहे. इतर रस्त्याचे काँक्रिटीकरण अलीकडेच करण्यात आले आहे. या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळेच या खड्ड्यामुळे दुचाकीस्वार राकेश यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी केला त्यावेळी पाठीमागून वेगात येणाऱ्या अज्ञात चार चाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर ते खाली फेकले गेले. मात्र या दरम्यान धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाने पोबारा केल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अपघाताबाबत उशिरापर्यंत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. ब्रिजवर पडलेल्या या खड्ड्यांसंदर्भात सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी वेळोवेळी महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित ठेकेदाराला कल्पना देऊन देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केला आहे. त्यामुळे या ठिकाणी वरचेवर अपघात होत आहेत. या अपघातांना महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार कंपनीत जबाबदार असल्याचा आरोप सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी केला असून याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे अन्यथा याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!