कुडाळराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कामगार सेनेच्या अध्यक्षपदी अरविंद सावंत यांची नियुक्ती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल,दि.११: शिवसेना उपनेते आणि माजी आमदार सूर्यकांत महाडिक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी आता शिवसेनेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. सावंत यांचे नियुक्तीपत्र शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. श्री. अरविंद सावंत हे कट्टर शिवसैनिक आणि निष्ठावान समजले जातात. गेली ३५ वर्षे ते युनियन क्षेत्रात काम करत आहेत. भाजपसोबतची युती तोडून महाविकास आघाडीचा पाय रचताना दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांना त्यांच्याकडील केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचा कार्यभार सोडून द्यावा लागला होता.

महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी शिवसेनेने भाजपसोबत युती तोडली. त्यामुळे केंद्रात मंत्रिपदी असलेले शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यात स्थापन झालेल्या महाविकासआघाडी सरकारमध्ये अरविंद सावंत यांना कोणतंही मंत्रीपद न दिल्यामुळे राजकीय धुरिणांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये देखील त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी न सोपवल्यामुळे ही चर्चा अधिकच वाढू लागली होती. अखेर शिवसेना नेतृत्वाकडून अरविंद सावंत यांचं पुनर्वसन करत त्यांची भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या कामगार कल्याणासाठी मी काम करत राहीन. तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याबद्दल जो विश्वास दाखवला त्याला खरे उतरण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. मराठी कामगारांना न्याय मिळवून देतानाच जास्तीत जास्त मराठी माणसाला रोजगार कसा प्राप्त होईल, यासाठीही मी प्रयत्न करीन. असे कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना अरविंद सावंत  यांनी सांगितले

अरविंद सावंत,अध्यक्ष,अखिल भारतीय कामगार सेना
अरविंद सावंत यांनी ३ दशकं महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचं नेतृत्त्व केलं आहे. त्यांना कामगार, कामगार मंत्रालय, केंद्राची कामगार धोरणे याबद्दलचा दीर्घ अनुभव देखील आहे. त्यामुळेच भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जाते.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!