कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*बांदा पोलिस ठाण्याजवळील जमीन पोलिस अधीक्षकांच्या नावे वर्ग होण्यासाठी साईप्रसाद कल्याणकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे उपोषणाचे निवेदन

*बांदा पोलिस ठाण्याजवळील जमीन पोलिस अधीक्षकांच्या नावे वर्ग होण्यासाठी साईप्रसाद कल्याणकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे उपोषणाचे निवेदन*

*तीन वेळा उपोषण करूनही जमीन वर्ग न झाल्यामुळे प्रशासनाला दिले पुनः एकदा आंदोलनाचे निवेदन*

सावंतवाडी, दि. २२ जुलै (प्रतिनिधी):
बांदा पोलिस ठाण्याच्या परिसरातील चाळ जमीन पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या नावे वर्ग करण्याची मागणी करणारे साईप्रसाद कल्याणकर यांनी यासंदर्भात आजपर्यंत तीन वेळा उपोषण करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे दि. २२ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पुन्हा उपोषण करण्याचा इशारा ई-मेलद्वारे दिला आहे.

*प्रशासनाकडून नोटीस – कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा निर्माण न करण्याचे आवाहन*
या पार्श्वभूमीवर बांदा पोलिस ठाण्याचे वतीने साईप्रसाद कल्याणकर यांना BNSS-१६८ अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, त्यांनी त्यांच्या मागणीसंदर्भात संबंधित शासकीय विभागांशी समन्वय साधावा, सकारात्मक चर्चा करून प्रश्न मार्गी लावावा आणि उपोषणासारख्या टोकाच्या आंदोलनाचा मार्ग अवलंबू नये.
प्रशासनाच्या बाजूने असा सूर आहे की, सार्वजनिक ठिकाणी उपोषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आंदोलन करण्यापूर्वी चर्चा आणि सामंजस्य यावर भर द्यावा, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
*भूमी वर्गणीचा प्रश्न रखडल्यामुळे असंतोष*
साईप्रसाद कल्याणकर यांचा आरोप आहे की, पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेली चाळ जमीन पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या नावे वर्ग करण्याचा प्रस्ताव प्रलंबित असून, प्रशासनाकडून मुद्दाम वेळकाढूपणाची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे त्यांनी न्याय हक्कासाठी पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले.
*सही व शिक्यासह नोटीस दिली*
बांदा पोलिस ठाण्याकडून साईप्रसाद कल्याणकर यांना दिलेल्या नोटीसीवर सही व शिक्क्यासह अधिकृतरित्या सूचना देण्यात आली आहे. यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर शांतीपूर्वक मार्ग शोधण्याचे आवाहन करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!