दिनेश गावडे : “दादाचा नादच खुळा” – लोकसेवेची निष्ठा, समाजकार्याची उर्मी*
*दिनेश गावडे : “दादाचा नादच खुळा” – लोकसेवेची निष्ठा, समाजकार्याची उर्मी*
आंबोली-चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघात गेली दहा वर्षे एक नाव लोकांच्या हृदयात खोलवर रुजले आहे — दिनेश गावडे. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अखंड सेवा देणारे आणि प्रत्येक अडचणीच्या वेळी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.
अतिशय गरिबीतून आलेल्या दिनेश गावडे यांनी कोल्हापूरसारख्या मोठ्या शहरात स्वतःचा फास्ट फूड व्यवसाय उभा करत यशस्वी उद्योजकतेचा आदर्श घालून दिला. मात्र केवळ व्यवसायात यश मिळवून थांबले नाहीत, तर समाजासाठी काहीतरी देण्याची तळमळ त्यांनी कधीही कमी होऊ दिली नाही.
आजवर जवळपास एक कोटी रुपयांची मदत त्यांनी शिक्षण, सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गरजूंची औषधे, अपघातग्रस्तांना मदत अशा अनेक माध्यमांतून केली आहे. हे आकडे केवळ खर्चाचे नाहीत, तर त्यांच्या मनातील समाजसेवेच्या आगीचे प्रतिक आहेत.
मतदारसंघातील कोणालाही अडचण आली की, एकच नाव आठवतं दिनेश गावडे.
*> “दादाचा नादच खुळा!”*
ही टॅगलाइन लोकांच्या मनात निर्माण झाली आहे ती त्यांच्या कृतीमधून, त्यांच्या उपस्थितीतून आणि वेळप्रसंगी त्यांनी दाखवलेल्या धाडसी निर्णयांमधून.
आंबोली, चौकुळ, सातोळी, बावळाट, देवसू, पारपोली, केसरी, दाणोली, विलवडे, भालावल, दाभिल ही गावे म्हणजे दिनेश गावडे यांच्या कार्यभूमीच आहेत. प्रत्येक गावात त्यांनी वेगळा ठसा उमटवला आहे — कुठे आरोग्य शिबिर, कुठे शैक्षणिक मदत, तर कुठे आपत्कालीन वेळेस धावून आलेले हात.
शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे आणि ती फक्त राजकारणापुरती मर्यादित नाही — ती भविष्यातील आशावादाची आणि विश्वासाची आहे.
त्यांचा २२ जुलै हा वाढदिवस, समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या एका कार्यकर्त्याचा प्रेरणादायी सण आहे
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिनेश दादा!तुमचा नाद असाच खुळा राहो, आणि समाजाच्या मनात तुम्ही अजून गहिरे रुजत राहा, हीच प्रार्थना!

