भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या त्या सात पैकी सहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश..
▪️मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधुन घेतले सहा जणांनी शिवबंधन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.०९: भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या त्या सात पैकी सहा नगरसेवकांनी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक रविंद्र रावराणे, संजय चव्हाण, दीपा गजोबार, संतोष पवार, रविंद्र तांबे, स्वप्निल इस्वलकर तसेच वैभववाडी बुथ प्रमुख संतोष निकम, दीपक गजोबार यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या सात नगरसेवकांनी यामध्ये तीन नगराध्यक्ष म्हणून पद भूषविलेल्या नगरसेवकांनी सोमवारी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर वैभववाडीत एकच खळबळ उडाली आहे. तर अंदाजानुसार यातील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर नगरसेविका संपदा राणे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला मात्र त्यांनी शिवसेना प्रवेश केलेला नाही. राजीनाम्यानंतर त्या काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना नेते अतुल रावराणे, तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश केला आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर यांच्यासह वैभववाडी शहरप्रमुख प्रदीप रावराणे, महेंद्र रावराणे आदी उपस्थित होते.
ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजपच्या सात नगरसेवकांनी दिलेले राजीनामे व यातील सहा जणांनी केलेला शिवसेना प्रवेश भाजपला धक्कादायक मानला जात आहे. या प्रवेशानंतर राजकीय हालचालींना जोर चढला असून नगरपंचायतीच्या निवडणूकी अगोदरच राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे आगामी निवडणूक ही शिवसेना भाजप यांच्यातच खरी लढत होणार आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

