🛑गोव्यातील राज्य शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये सिंधुदुर्गच्या नेमबाजांची चमकदार कामगिरी.
*🛑गोव्यातील राज्य शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये सिंधुदुर्गच्या नेमबाजांची चमकदार कामगिरी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* नुकतीच गोवा येथे सातवी ऑल गोवा स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा यश शूटिंग हब मांद्रिम,गोवा येथील रेंज वर घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये उपरकर शूटिंग अकॅडमीच्या स्पर्धकांनी सहभाग घेऊन आठ सुवर्ण व तीन रौप्य पदक पटकावून यशस्वी कामगिरी केली.
यामध्ये कु.अवनी विक्रम भांगले (मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी) हिने 10 मीटर पिस्तूल प्रकारात सब युथ व युथ गटात सुवर्ण पदकांची कमाई केली.त्याच प्रमाणे कु. श्रिया अतुल नाखरे ( संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ) हिने याच क्रीडा प्रकारात युथ व जुनिअर गटात रौप्य तर खुल्या गटात सुवर्ण पदक पटकाविले.तसेच श्री.अतुल लक्ष्मण नाखरे यांनी 10 मीटर एअर पिस्तूल(ISSF) व 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तूल (खुला गट)या दोन्ही क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले.तर कु.अद्वैत अतुल नाखरे (मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी) याने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक मिळविले.
त्याच प्रमाणे पहिल्यांदाच स्पर्धे मध्ये सहभागी होऊन श्री चिराग शंभू बांदेकर (कसाल) यांनी 10 मीटर ओपन साईट रायफल प्रकारात व 50 मीटर 0.22 पिस्तूल प्रकारात खुल्या गटात उत्कृष्ट कामगिरी करून 2 सुवर्ण पदक पटकाविली.तसेच मागील वर्षीचे रौप्य पदक विजेते श्री. जयवंत शंकर घोगळे यांनी या आपल्या कामगिरीत सुधारणा करून यावर्षी सुवर्ण पदक पटकाविले. त्यांनी 10 मीटर रायफल प्रकारात सहभाग घेतला होता.उपरकर शूटिंग रेंजच्या खेळाडूंनी यावर्षीही आपली विजयाची परंपरा कायम राखली. आतापर्यंत रेंजच्या खेळाडूंनी राज्य नेमबाजी स्पर्धेत 70 हुन अधिक तर राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये 54 राष्ट्रीय पदक मिळविली आहेत.
सदरचे नेमबाज हे उपरकर शूटिंग अकॅडमी वर सराव करत असून त्यांना प्रशिक्षक श्री. कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण व आंतरराष्टीय प्रशिक्षक श्री. विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या सर्व नेमबाजांची जिल्हा क्रीडा कार्यालय ओरोस व सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

