🛑अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर.
*🛑अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर.*
*🛑विद्यार्थ्यांना दिलासा : दुसरी यादी केव्हा?*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* बहुप्रतिक्षीत अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांची यादी अखेर ३० जूनला जाहीर झाली आहे. यादी जाहीर झाल्यामुळे पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या विद्यार्थी आणि पालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसंदर्भात असलेली त्यांची धाकधूक काही अंशी कमी झाली आहे. कला, विज्ञान आणि वाणिज्य या तिन्ही शाखांमधील विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यंदा दहावीचा निकाल लवकर जाहीर झाल्याने अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होऊन वर्गही लवकर सुरू होतील अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती. मात्र, शासनाने यंदा राज्यभरात अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. या ऑनलाईन प्रक्रियेत आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश प्रक्रिया लांबली, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर, सोमवारी यादी जाहीर झाल्याने ही प्रतीक्षा संपली आहे.
*पुढील यादीची प्रतीक्षा*
दरम्यान,पहिल्या यादीत ज्या विद्यार्थ्यांचा समावेश नाही, त्यांच्या मनातील धाकधूक अजूनही कायम आहे. आता त्यांचे लक्ष दुसऱ्या टप्प्यातील यादीकडे लागले आहे. काही विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया यादी अजूनही पूर्णपणे जाहीर न झाल्यामुळे ती थांबलेली आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनाही पुढील यादीची प्रतीक्षा आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

