🛑सावंतवाडीत उद्या शक्तीपीठ महामार्ग विरोधासाठी बैठक.
*🛑सावंतवाडीत उद्या शक्तीपीठ महामार्ग विरोधासाठी बैठक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठल्याही ग्रामस्थांची, शेतकऱ्यांची, बागायतदारांची मागणी नसताना, गरज नसताना जबरदस्तीने त्यांच्यावर लादण्यात येत असलेल्या नागपूर ते पत्रादेवी द्रुतगती शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण व निसर्गप्रेमी, सर्वसामान्य नागरिक अशा सर्वांची एकजूट बैठक बुधवार, २ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉल येथे आयोजित केलेली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संवेदनशील निसर्ग असणाऱ्या बारा गावांतून प्रस्तावित असलेला हा शक्तीपीठ महामार्ग हा जैवविविधता, निसर्ग उद्धवस्त करणारा, पिण्याच्या पाण्याचा आणि शेती बागायतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित करणारा ठरणार आहे. गेळे, आंबोली, पारपोली, नेनेवाडी, घारपी, फुकेरी, असनिये, तांबोळी, झोळंबे, डेगवे, बांदा अशा बारा गावांतून हा महामार्ग जाणार असून पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील निसर्ग असलेल्या जंगलातील लाखो वृक्षांची कत्तल होणार आहे. ही सह्याद्रीतील राक्षसी वृक्षतोड पर्यावरणाला घातक ठरेलच, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. हा सर्व परिसर वन्यजीवनाने समृद्ध असून वाघाचा संचारमार्ग याच भागातून जातो.
राज्यातील बाराही जिल्ह्यात या महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. सर्व ठिकाणी शेतकरी, नागरिक आक्रमकपणे, परंतु सनदशीर मार्गाने या राक्षसी प्रकल्पाला विरोध करीत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अशाप्रकारचे आंदोलन उभे राहणे, आवश्यक आहे. यासंदर्भात विचार करून कृतीकार्यक्रम ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीला उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक, ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती सिंधुदुर्गचे डॉ. जयेंद्र परुळेकर, सतीश लळीत, प्रसाद पावसकर, संदीप सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

