नियमित आरोग्य तपासणी हीच उत्तम आरोग्याची चतु:सूत्री; डाॅ. तरन्नुम खलिफे
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर
🎴रत्नागिरी,दि.०९: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशभरात गेली काही महिने लॉकडाऊन पाळण्यात आले होते. हळूहळू परिस्थितीत सुधारणा होत आहे आणि अनलॉकच्या माध्यमातून नियम शिथिल करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या भितीने नियमित आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष केल्याने अनेक व्यक्तींना आता आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रत्नागिरी मधील प्राईम डायग्नोस्टिक्स सेंटरच्या वतीने नागरिकांना नियमित आरोग्य समस्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तपासण्याच्या माध्यमातून वेळीच विविध विकारांना आळा घालणे शक्य होते तसेच काही आजारांवर नियंत्रण ठेवता येते. प्राईम डायग्नोस्टिक्स सेंटरच्यावतीने २४ तास अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येत असून याठिकाणी एमआरआय, मल्टी स्लाईस सिटी स्कॅन, सोनोग्राफी, पॅथोलॉजी,
कलर डॉप्लर, ३०० एमए डिजीटल एक्स-रे, ईसीजी आदी चाचण्या एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अद्ययावत तंत्रज्ञान आणि सुविधांनी सज्ज अशा या सेंटरचा लाभ प्रत्येकाला घेता येणार आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये टाळाटाळ करण्यात आलेली आरोग्य तपासणीला गांभीर्याने घेत प्रत्येकाने आपल्या ती करून घेणे आवश्यक आहे. वाढत्या वयानुसार नियमित आरोग्य तपासणी करणे अधिक महत्त्वाचे असते. म्हणूनच, दर सहा महिन्यांनी तपासणी करावी.
रक्त तपासण्या बरोबर छातीचा – CHEST XRAY , पोटाची व ओटीपोटाची ( ABDOMEN & PELVIS ) सोनोग्राफी व विशेषतः स्त्रीयांमध्ये स्तनाची सोनोग्राफी व मॅमोग्राफी दरवर्षी करणे व वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे प्राईम डायग्नोस्टिक्स च्या रेडिओलाॅजिस्ट डाॅ तरन्नुम खलिफे सांगतात.
कोरोना हा संसर्गजन्य रोग असला तरी कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. स्वतःच्या मर्जीने औषधे न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करणे आवश्यक आहे. वेळोवेळी शारीरीक तपासणी करण्यास टाळू नका. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
काही तपासण्या उपाशीपोटी कराव्या लागतात. जसं की फास्टींग शुगर, शक्यच होत नसल्यास पोट रिकामं झाल्यानंतर कराव्यात. आपला दैनंदिन आहार बदलू नये. तसंच व्यसन टाळावं. पूर्ण विश्वासाने तसंच शांत मनाने तपासण्यांना सामोरं जावं. आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळेत डॉक्टरांना दाखवणं व त्यांनी सांगितलेल्या तपासण्यांमधून रोगनिदान वेळीच होणं आपल्यासाठी योग्य ठरते.
_*🚗इन्शुरन्स काढायचा आहे.. “Don’t Worry”*_
*🌈आता आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढा अगदी आपल्या खिशाला परवडेल अशा पैशात..🚗*
*🛵आमच्याकडे सर्व गाड्यांचे फुल इन्शुरन्स,थर्ड पार्टी इन्शुरन्स काढून मिळतील..*
*🚗तुमच्या खिशाला परवडतील अशा विविध रक्कमेच्या इन्शुरन्स पाँलिसी उपलब्ध..*
_*🤷🏻♂️ संपर्क : विशाल पित्रे, सावंतवाडी*_
_*📱मोबाईल : 9405475712*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

