🛑मळेवाड चराटकरवाडी येथील विद्युत पोल वरील तुटलेल्या फ्युजला चक्क काठीचा आधार.
*🛑मळेवाड चराटकरवाडी येथील विद्युत पोल वरील तुटलेल्या फ्युजला चक्क काठीचा आधार.*
*🛑धोकादायक स्थितीत असलेल्या पोल वरील तारा जमिनीवर आहेत लोंबकळत.*
*🛑पोलच्या आजू बाजूला पाण्याचा प्रवाह.*
*🛑या ठिकाणी ग्रामस्थ,लहान मुल, शेतकऱ्यांची गुरे , यांची असते सतत ये जा.*
*🛑सदरील प्रकार निदर्शनास आणूनही अजून पर्यंत कोणीही दखल न घेतल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे.*
*🛑एखादी दुर्घटना घडली तरच संबंधित विभागाला जाग येणार का? असा संतप्त केला जात आहे सवाल.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- १६:-* मळेवाड गावात बऱ्याच ठिकाणी सध्या विद्युत वाहिन्यांवर, विद्युत पोल वर झाडी वाढून ,ते धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे नेहमी प्रमाणे जरा कुठे पाऊस , वारा आला की कायमच येथील बत्ती गुल होत असते.त्यात करून लाईट बाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर कॉल लागत नाही. हे तर रोजचेच प्रकार घडत आहेत. मात्र विद्युत बिले भरमसाठ वाढत आहेत.
एखाद्या वेळी अशा प्रकारची घटना निदर्शनास आणली की,नेहमी प्रमाणे “करतो” हेच उत्तर असते मात्र वेळ गेली की कोणीही तिथे बघत नाही.
असाच काहीसा प्रकार मळेवाड चराटकर वाडी येथे निदर्शनास पडत आहे.येथील विद्युत पोल वरील अनावश्यक तारा ह्या जमिनीवर लोंबकळत असून ह्या पोल वर अगदी हाताला मिळतील अशा फ्यूज असून ह्या तुटलेल्या स्थितीत असून त्याला चक्क काठीचा आधार देण्यात आला आहे. सध्या पावसाचे दिवस असून या पोल च्या बाजूला येथील शेतकऱ्यांची शेती असून,येथून पुराचे पाणी वाहत असते.त्याच प्रमाणे येथे घरे असल्याकारणाने येथील लहान लहान मुले,शेतकरी ग्रामस्थ यांची सतत ये – जा असते. मात्र एवढ असतानाही ह्या पोलवरील तारा,तुटलेल्या काठीचा आधार दिलेल्या फ्यूज बदलायला या विभाकडे वेळच नाही.म्हणजे एखादी मोठी दुर्घटना घडली किंवा निवेदन दिली तरच ही कामे होणार काय? असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करत आहे.त्यामुळे लवकरात लवकर याबाबत योग्य ती कारवाई करून पुढील होणारा अनर्थ टाळावा ही मागणी होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

