आणखी

राजापूर तालुक्यातील पन्हाळे गावच्या पुढे एका हॉटेलमध्ये रंगत असलेलेली जुगाराची बंद झालेली मैफील पुन्हा जोमाने सुरू..

*राजापूर तालुक्यातील पन्हाळे गावच्या पुढे एका हॉटेलमध्ये रंगत असलेली जुगाराची बंद झालेली मैफील पुन्हा जोमाने सुरू*

 

*राजापूर तालुक्यातील पन्हाळे गावच्या पुढे एका हॉटेलमध्ये रंगते जुगाराची मैफील*

 

*आर्थिक तडजोडीची ऑडिओ क्लिप हाती.सत्यता पडताळून गृहविभागाला पाठविणार*

 

*एका रात्रीत होतेय लाखोंची रुपयांची उलाढाल*

 

राजापूर, दि- १४:-* रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्याती पन्हाळे गावच्या पुढे रस्त्यालगत महाराजांच्या नावाने चालणाऱ्या एका हॉटेल च्या माडीवर रात्रो अकरा ते सकाळी सात पर्यंत अंदर बाहर जुगार चालत असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यावर पोलिसांच्या आदेशाने हा जुगार अड्डा पाच दिवस बंद ठेवण्यात आला आता पुन्हा मोठी मांडवली करुन हा अड्डा पुन्हा सुरू करण्यात आला आहे,या मांडवलीची एक ऑडीओ क्लिप उपलब्ध झाली असून या मधून पोलिस खात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

या जुगार अड्ड्यावर एका रात्रीत लाखोंची उलाढाल होत आहे. हे सर्व जिल्हा पोलिस व स्थानिक पोलीस यांच्या वरदहस्ताने सूरु असल्याची तक्रार पन्हाळे गावच्या ग्रामस्थांनी केली होती ती हाती लागलेल्या ऑडीओ क्लिप ने सिध्द झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उघडपणे चालणारे अंदर बाहर जुगार बंद झाल्यावर सिंधुदुर्गातील आठ पार्टनर व रत्नागिरीतील दहा असे मिळून अठरा जण हा जुगार अड्डा चालवत आहेत, यासाठी वर पासून खाल पर्यंत हप्ता ठरविण्यात आल्याने आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही. एखाद्या वेळी दबावामुळे रेड मारावी लागली तरी पोलिस आम्हाला त्याची अगोदरच माहिती देतात म्हणून आम्हाला कोणाची भिती नाही अशा फुशारक्या हे जैतूपकर नावाचा मुख्य म्होरक्या व फोंडू चा पारावरचा विठ्ठल, महाराजांचे नाव असलेल्या त्या हॉटेल चा मालक मारत आहेत पण एका बातमी मुळे या फुशारक्या मारणाऱ्या जुगारी पंटराना आपला जुगार अड्डा बंद ठेवावा लागला होता व आता पुन्हा आपली बोली वाढवून हा जुगार अड्डा सुरू करण्यात आला आहे.

पोलिस प्रशासनाचे हात जर खरोखरच बरबटलेले नसतील तर ग्रामस्थांचा विरोध असताना कारवाई करायला प्रशासन का धजावत नाही की त्यांच्या हाताला लकवा झाला आहे असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ विचारत आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जुगारातील पंटर व राजकीय आश्रय असलेले म्होरके रात्रीची राजापूर वारी करीत असतात व हे सर्व राजकीय आश्रयाखाली चालू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.याबाबत प्राप्त झालेल्या ऑडीओ क्लिप ची सत्यता पडताळून गृहविभागाला पाठविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!