आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 विजेचा धक्का: सख्ख्या भावांचा भीषण अपघात ; एक ठार, एक गंभीर

🛑 महावितरणच्या निष्काळजीपणावर ग्रामस्थांचा संताप; एकही अधिकारी रुग्णालयात हजर नाही

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१४:- दोडामार्ग तालुक्यातील मांगेली कुसगेवाडी येथे आज शनिवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक अपघातात विजेचा जोरदार धक्का लागून सख्ख्या भावांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

मृत व्यक्तीचे नाव नागेश पांडुरंग गवस (३५) असून, त्यांचे मोठे भाऊ संदीप पांडुरंग गवस (४५) हे गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर गोवा जीएमसी, बांबोळी येथे उपचार सुरू आहेत. दोघेही कुसगेवाडीतील रहिवासी आहेत.

अपघातानंतर दोघांना तातडीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी नागेश गवस यांना मृत घोषित केले. संदीप गवस यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोव्यात हलवण्यात आले.

या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून गवस कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेषतः मृत्यू पावलेल्या नागेश गवस यांच्या आईचा आक्रोश संपूर्ण परिसराला सुन्न करणारा आणि हृदय पिळवटून टाकणारा होता. तिच्या हंबरडा फोडणाऱ्या किंकाळ्या पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

दुसरीकडे, महावितरणच्या निष्काळजीपणावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही धोकादायक विद्युत वाहिन्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. इतकी भीषण दुर्घटना घडूनही महावितरण विभागाचा एकही अधिकारी वा कर्मचारी रुग्णालयात हजर न राहिल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!