🛑 अरुणा प्रकल्पग्रस्तांसाठी नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लावणार ; जलसंपदामंत्री गिरीश महाजन
🛑 सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने मुंबईत बैठक; पुनर्वसित गावांना मूलभूत सुविधा देण्याचे निर्देश
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंबई, दि-११:- वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात मासव्यवसाय मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अरुणा प्रकल्पाच्या पुनर्वसित गावांतील नागरी सुविधांअभावी निर्माण झालेल्या अडचणींवर चर्चा झाली.
बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, प्रकल्पग्रस्त नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात.
अरुणा मध्यम प्रकल्पग्रस्तांनी वीज, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ तसेच मासव्यवसायमंत्री नितेश राणे यांच्याकडे विविध मागण्या मांडल्या. या बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव अतुल कोपे, अधीक्षक अभियंता तसेच उपसंचालक प्रविण काळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला.
या प्रकल्पामुळे पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधा नसल्यानं स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर नागरी सुविधा पुरवण्याबाबत योजना आखण्यात यावी, अशी सूचना कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने केली असून ती जलसंपदामंत्री महाजन यांनी मान्य केली.
पुनर्वसित गावांमध्ये प्लॉट घेतलेल्या कुटुंबांना घरे मिळावीत, असा मुद्दा मंत्री नितेश राणे यांनी मांडला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले.
पुनर्वसित गावांमध्ये क्रिडांगणे व सार्वजनिक जागा उपलब्ध असून त्यांचा उपयोग योग्य प्रकारे करण्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या ठिकाणी पायाभूत सुविधा देण्यासाठी जलसंपदामंत्री महाजन यांनी सकारात्मक भूमिका घेतली.
अरुणा प्रकल्पग्रस्तांचे पाच गावे पूर्णतः पुनर्वसित झाले असून उर्वरित गावांतही सुविधा देण्याचे काम सुरु आहे.
बैठकीच्या शेवटी मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की, निधीची कमतरता कारण न होता प्रकल्पग्रस्तांसाठी शासकीय स्तरावर त्वरित निर्णय घेण्यात येईल. निधी उपलब्ध असून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

