🛑 आंबोलीत युवकांसाठी ‘निसर्ग पर्यटन मार्गदर्शक’ प्रशिक्षण शिबिर,अधिकाधिक युवकांनी या शिबिरात सहभागी व्हावे ; सरपंच सौ. सावीत्री पालेकर
🛑 स्थानिक रोजगार निर्मितीसाठी ग्रामपंचायत व वनविभागाचा पुढाकार; १२ व १३ जूनला शिबिराचे आयोजन
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत
🎴आंबोली, दि-११:- गावातच रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने आंबोली ग्रामपंचायत आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंबोलीतील युवकांना ‘निसर्ग पर्यटन गाईड’ म्हणून प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे प्रशिक्षण शिबिर १२ व १३ जूनला आंबोली येथे होणार आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या युवकांना प्रमाणपत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे युवकांना भविष्यात स्थानिक पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.
या उपक्रमामागे आंबोली ग्रामपंचायत सरपंच सौ. सावीत्री पालेकर यांची विशेष पुढाकाराने भूमिका आहे. त्यांनी युवकांना आवाहन करताना म्हटले की, “गावात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा योग्य उपयोग करून युवकांनी स्थानिक स्तरावर रोजगार निर्माण करावा. या शिबिरातून त्यांना त्या दृष्टीने दिशा मिळेल.”
सरपंच पालेकर यांनी यासंदर्भात प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली असून युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले आहे.
या शिबिराचे मार्गदर्शन पर्यावरण अभ्यासक हेमंत ओगले, महादेव भिसे, भाग्यश्री परब व राजेश देऊळकर हे करणार आहेत. आंबोलीत मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने, प्रशिक्षित युवकांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा उद्देश आहे.
तरी अधिकाधिक युवकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

