आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 आदर्शांचा वारसा… पप्पांच्या आठवणींच्या साक्षीने

🛑 वर्षश्राद्ध निमित्त पित्याच्या कार्याचा मागोवा घेणारा एक भावनिक लेख

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍🏻 लेखक – राकेश नामदेव धर्णे

🎴दोडामार्ग, दि-११:- आज पप्पांचं वर्षश्राद्ध. त्यांच्या देहाला निरोप दिल्याला एक वर्ष पूर्ण झालं. पण खरं सांगायचं तर ते आजही माझ्या श्वासात, विचारात, आणि कृतीत जिवंत आहेत. त्यांच्या जाण्याने शून्यता वाटली खरी, पण त्यांच्या आठवणी, शिकवण आणि समाजासाठीचं समर्पण मला आजही प्रत्येक वळणावर दिशा देतं.

 

*संघर्ष, सेवा आणि माणुसकीचं दर्शन*

 

पप्पांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे एक सततचा संघर्ष, आणि त्यातून उमटणारी सेवा-भावनेची प्रेरणा. ते साटेली-भेडशीचे माजी सरपंच होते, पण त्यांचं नेतृत्व फक्त पदापुरतं मर्यादित नव्हतं. गावात रस्ते, गटारे, स्मशानभूमीचं शेड, पाणी योजना — ही मूलभूत कामं त्यांनी निस्वार्थ भावनेने केली. हे काम त्यांच्यासाठी कर्तव्य नव्हतं, तर उपकारही नव्हते ते फक्त आणि फक्त “गावासाठी” होतं.ते कधीही ‘मी केलं’ असं म्हणाले नाहीत. ते नेहमी म्हणायचे, “हे आपल्या गावाचं काम आहे; आपलं घर आहे.

 

*पप्पांचे सामाजिक योगदान*

 

पप्पांनी समाजासाठी झिजून दाखवलं. शिक्षणात मदत, पर्यावरणासाठी झाडं लावणं, गोरगरीबांसाठी मदतीचा हात पुढे करणं हे त्यांचं रोजचं आयुष्य होतं. त्यांना मिळालेले राज्यस्तरीय ‘एकता गौरव पुरस्कार’, ‘समाजरत्न पुरस्कार’, ‘समाज गौरव पुरस्कार’, आणि प्रगतशील शेतकरी म्हणून गौरव हे त्यांच्या कार्याचं समाजाकडून मिळालेलं मान्यतापत्र होतं.

 

 

*माणूस म्हणून मोठेपणा*

 

पप्पांचं खरं मोठेपण त्यांच्या वागण्यात होतं. कोणत्याही वृद्ध व्यक्तीला रस्त्यात पाहिलं की “आवशी बरी आसय मा…” असं म्हणत ते तिला प्रेमाने घरी सोडत. त्यांचं बोलणं, वागणं, आणि प्रत्येक माणसातला माणूस पाहण्याची नजर यामुळेच ते सर्वांच्याच काळजाला भिडले होते.

 

*धार्मिक निष्ठा आणि भक्तिभाव*

 

प.पू. श्री राऊळ महाराज यांच्याप्रती असलेली त्यांची निष्ठा ही नुसती श्रद्धा नव्हती, तर ती आत्मिक जोड होती. भजन, कीर्तन, पूजाविधी, उत्सव यामध्ये त्यांची उपस्थिती म्हणजे एक शांत, समर्पित भक्ताचं दर्शन असे.

 

*पप्पा म्हणजे माझे जीवन शिक्षक*

 

माझ्यासाठी पप्पा म्हणजे फक्त जन्मदाता नव्हे, तर आयुष्य जगण्याचं शहाणपण शिकवणारे गुरु होते. त्यांनी शिकवलं की पद, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्यांपेक्षा मोठं आहे माणुसकी. ते म्हणायचे, “प्रामाणिकपणा आणि दुसऱ्याच्या सुखासाठी झिजणं यातच खरं समाधान आहे.”

 

*समाज म्हणजे माझं कुटुंब… आणि पप्पांचा वारसा माझं उत्तरदायित्व*

 

पप्पांनी मला शिकवलं “समाज म्हणजे माझं मोठं कुटुंब आहे.”

गावात कोणाचं दुःख असेल, अडचण असेल, तर आपण पहिल्यांदा मदतीसाठी पुढे जावं ही त्यांची शिकवण मला नेहमी जाणवत राहते.

आज मी वचन देतो पप्पांनी ज्या मूल्यांसाठी आयुष्य समर्पित केलं, तो ‘समकार्याचा वारसा’ मी चालवत राहीन.मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजाच्या, गावाच्या, आणि प्रत्येक गरजू माणसाच्या सोबतीने चालत राहीन.कारण त्यांचं जीवन हे फक्त आठवणींमध्ये जपायचं नाही, तर कृतीतून पुढे न्यायचं आहे.पप्पा… तुमचं आयुष्य माझ्यासाठी मार्गदर्शन आहे.तुमचं विचारधन, हीच माझी खरी संपत्ती आहे.तुमच्या नावाचा आदर, तुमच्या कामाचा मान, आणि तुमच्या स्वप्नांचा वारसा हेच माझं व्रत आहे.

 

*साश्रूनमन… तुमच्या चरणी नतमस्तक…*

राकेश नामदेव धर्णे

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!