🛑 “केसरकरांच्या हतबलतेवर रुपेश राऊळ यांचा घणाघात!”
🛑 आरोग्य, वीज आणि रोजगाराच्या प्रश्नांवरून थेट आरोप; ‘डॉक्टर तुम्हीच आणा’ विधानावरून सरकारवर अप्रत्यक्ष टिकास्त्र
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१०:- “वारंवार आमदार, मंत्रीपद भूषवलेले आणि प्रशासनाचा अभ्यास असलेले दीपक केसरकर आरोग्य, वीज वितरण व रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर अपयशी ठरत आहेत,” असा घणाघात ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत “तुम्ही डॉक्टर आणा” असे केसरकरांनी पत्रकारांनाच सांगितल्यामुळे त्यांच्या हतबलतेचे दर्शन घडते, असे सांगत त्यांनी महायुती सरकारच्या अपयशाची ठपका केसरकरांच्या विधानातूनच समोर येतो, असे राऊळ म्हणाले.
राऊळ यांनी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण गोवा येथे पाठवले जात असल्यावरून केसरकरांवर सडकून टीका केली. मंत्रीपद भूषवलेल्या व्यक्तीने असे विधान करणे धक्कादायक असल्याचे ते म्हणाले. तसेच, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची केवळ चिपळी वाजवण्यात धन्यता मानणाऱ्या केसरकरांनी जर त्यांना किंमत दिली जात नसेल, तर ते जाहीर करावे” अशी मागणी केली.
हत्ती पकड मोहीम आणि वन्य प्राण्यांचा हैदोस
राऊळ यांनी “वरातीमागून घोडे नाचवणारे” अशी उपमा देत केसरकरांवर आरोप केला की, त्यांच्याकडे केंद्र आणि राज्यात सत्ता असूनही हत्ती पकड मोहीम रखडलेली आहे. विनायक राऊत यांनी ही मोहीम राबवली होती, पण केसरकर मात्र जबाबदारी टाळतात. कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांच्यावर ठपका ठेवत शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
‘कात’ व्यावसायिक व शेतकऱ्यांबाबतही उदासीनता
कात व्यावसायिकांची आठवण आठ महिन्यांनी झाल्याची टीका करत, “शेतकरी व कात व्यावसायिक दूधखुळे नाहीत, हे केसरकरांनी लक्षात ठेवावे” असा सल्ला दिला.
“विजेचा लपंडाव, रोजगाराचा अभाव, आरोग्य यंत्रणेतील ढिसाळपणा या मुद्द्यांवर केसरकर अजून किती दिवस फक्त चर्चा करणार आहेत?” असा थेट सवालही राऊळ यांनी उपस्थित केला.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

