🛑 सिंधुदुर्ग जिल्ह्यात ई स्टोअर इंडिया या कंपनीचा जवळपास १०० कोटीचा घोटाळा
ई स्टोअर इंडिया या कंपनीने नेटवर्क मार्केटिंग सिद्धांत वापरून कमी दरात वेदिक आयुरकेअर या नावाखाली आयुर्वेदिक उपचार तसेच औषधे व ई स्टोअर इंडिया या नावाने ३३ टक्के दरात किराणा सामान देण्याचे वचन व मार्केटिंग आयडी वर मूळ रक्कम जवळ पास सदर रक्कम तिप्पट करण्याचे वचन देऊन ई स्टोअर इंडिया या कंपनीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास १०० कोटीचा घोटाळा केला आहे संपूर्ण भारतात हा आकडा काही हजार कोटीच्या आसपास आहे . फैजान खान हा या कंपनीचा दुबईस्थित प्रमुख संस्थापक होता, त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खालील एजंट ना एकत्रीत घेऊन यात अनिल जाधव (रामगड ) देविदास परब (देवगड तारामुंबरी), संजना परांजपे (पनवेल), शैलेंद्र पेडणेकर (सावंतवाडी), रौनक पटेल (कणकवली), सचिन सावंत (कुडाळ), किरण कदम (कुडाळ नारूर) स्वप्नील गावडे, संजय पवार या प्रमुख एजंट द्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच संपूर्ण भारतातील लोकांना पैशाचे आमिष दाखवून लुबाडले , या मध्ये कित्येक लोकांची आयुष्यभराची जमा केलेली रक्कम गेली, कित्येक लोकांनी आपल्या FD फोडल्या, निवृत्तीची रक्कम भरली, या मध्ये कित्येक बचत गट, छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचेही पैसे लुबाडले गेले. कंपनी बंद पडून जवळपास दोन वर्ष झाली, ज्या वेळी कंपनी बंद पडली त्या वेळेपासून अनेक वेळा जिल्ह्यातील स्थानिक पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती, पण सदर प्रकरणावर अजून कोणतीही कार्यवाही केली गेली नाही तसेच सदर एजंट ना अजून अटक सुद्धा करण्यात आली नाही त्या मुळे सिंधुदुर्गातील सर्व ई स्टोअर फ्रॉड ला बळी पडलेल्या लोकांनी एकत्र येऊन सिंधुदुर्गची जिल्ह्याची कमिटी करून पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांना निवेदन देऊन सदर एजंट वर तत्काळ करून जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या लोकांचे पैसे लवकरात लवकर मिळावे व सदर प्रकरणावर त्वरीत कारवाई न झाल्यास येत्या १५ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व फसवणूक झालेल्या व्यक्ती पोलिस अधीक्षक कार्यालया समोर आमरण उपोषण करतील असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.
यावेळी मिताली केळुसकर देवगड, मार्शल फर्नांडिस मालवण, चंद्रशेखर कुबल मालवण, शर्वरी गावडे वेंगुर्ला, वैभवी परब मालवण, विनायक परब मालवण, श्रीनिवास मेस्त्री मालवण, ऐश्वर्य मांजरेकर मालवण, चंद्रशेखर कुबल मालवण स्मिता लंगोटे मालवण , सुवर्णा भोगावकर मालवण, उमा मसुरकर मालवण, सुरेखा जोशी देवगड, गीता परमाज देवगड, मेरी फर्नांडिस मालवण,बाबू खरात कुडाळ, चंद्रशेखर मांजरेकर वेंगुर्ला, व जिल्ह्यातील अन्य फसवणूक झालेल्या व्यक्ती उपस्थित होत्या.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

