कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑स्मार्ट मीटरधारक ग्राहकांना बिलाची प्रत मिळेना.

*🛑स्मार्ट मीटरधारक ग्राहकांना बिलाची प्रत मिळेना.*

 

*🛑मीटरसाठी बिले वाटप कार्यपद्धती निश्चित नाही.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २९:-* महावितरणकडून नियमित मीटरच्या बदल्यात स्मार्ट मीटर बसविण्याची कार्यवाही सुरू आहे काही ठिकाणी हे मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, या मीटरच्या दरमहाच्या बिलाची कॉपी ग्राहकांना मिळत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. नियमित बिल वाटप करणाऱ्या एजन्सीकडून स्मार्ट मीटरची बिले वाटली जात नसल्याने ही समस्या असून बिल जनरेट होताच एसएमएसद्वारे बिल जाते. तसेच ग्राहकांना बिल कॉ पीही देण्याची कार्यवाही लवकरच होईल, असे महावितरणच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.

महावितरणकडून वीज बिल ग्राहकांना बिले वाटण्यासाठीच्या एजन्सी निश्चित आहेत. या एजन्सीकडून रिडिंग घेणे व त्यानंतर प्राप्त बिले वाटण्याचे काम केले जाते. यासाठी निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार प्रत्येक वीज बिलामागे कमिशन दिले जाते. त्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून कार्यवाही सुरू आहे.

मात्र, नव्याने जे स्मार्ट मीटर बसविण्यात येतात, ते बसविल्यानंतर या मीटरचे रिडिंग घेण्यासाठी एजन्सीच्या माणसाला येण्याची गरज नाही. दरमहा ठरलेल्या तारीखला या स्मार्ट मीटरचे रिडिंग सर्व्हरच्या माध्यमातून जनरेट होते तसेच स्मार्ट मीटरचे रिडिंग घेणे वा बिले वाटण्यासाठी प्रचलित पद्धतीत अद्याप कमिशन निश्चित नसल्याने स्मार्ट मीटरचे जरी बिल आपोआप जनरेट झाले, तरीही त्या बिलाची कॉपी ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. कारण नियमित बिले वाटप करणाऱ्या एजन्सीला या बिलांच्या वाटपाचे काम दिलेले नसून अद्याप त्याबाबत कमिशन निश्चित नसल्याने ही समस्या उद्धवल्याचे समजते.

महावितरणच्या सुत्रांशी संपर्क साधला असता, स्मार्ट मीटरचे बिल जनरेट झाल्यानंतर ग्राहकाचा जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्या नंबरला आपोआपच बिलाबाबतचा मेसेज जातो. मात्र, तरीही ग्राहकांना बिल कॉपी देणे आवश्यक असल्याने याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच स्मार्ट मीटरच्या ग्राहकांनाही बिलाची कॉपी मिळेल, असे सांगण्यात आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!