आणखी

गुजरातला जाणारी गोवा बनावटी दारु आंबोली पोलिसांनी पकडली

गुजरातला जाणारी गोवा बनावटी दारु आंबोली पोलिसांनी पकडली

 

१६ लाखाचा दारुसह मुद्देमाल जप्त

 

 

 

सावंतवाडी, दि.१८:- आंबोली चेकपोस्ट येथे आज गोवा ते गुजरात जाणारी महिंद्रा गाडीत गोवा बनावटी अवैध दारू पकडली. अधिक माहिती अशी की,वाहन क्रमांक GJ 19/Y/5098 महिंद्रा पिक अप या वाहनाची तपासणी करत असताना वाहनात पत्र्याचे कंपार्टमेंट बंद असल्याने ते कापून करून तपासले असता त्यामध्ये गोवा बनावटीचे Royal malt Whisky चे ११० बॉक्स मिळून आल्याने आरोपी शैलेश कुमार रामाभाई बारिया (राह. जि. पंचमहाल, गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दारू – 6,33,600/-,वाहन किंमत -10,00,000/-,एकूण – 16,33,600/-मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल,अपर पोलीस अधीक्षक रुषीकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व आंबोली दुरक्षत्र अंमलदार पो. हवालदार रामदास जाधव, पोलिस नाईक मनिष शिंदे, होमगार्ड आनंद बरागडे व चंद्रकांत जंगले यांनी आंबोलीच्या चेक पोस्ट येथे करण्यात आली. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!