🛑कुडाळमार्गे कोल्हापूर सकाळची बसफेरी सुरू करावी !
*🛑कुडाळमार्गे कोल्हापूर सकाळची बसफेरी सुरू करावी !*
*🛑सावंतवाडी-वेंगुर्ले आगारातून बस सोडावी : विभागीय कार्यालयाने गांभीर्याने विचार करावा!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १८:-* कोल्हापूर येथे जाण्यासाठी सकाळी तरकर कुडाळमार्गे एस. टी. बस नाही. अक्षय त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. सावंतवाडी किंवा वेंगुर्ले आगारातून कुडाळमार्ग कोल्हापूर बसफेरी सुरू करावी, अशी मागणी गेली काही वर्षे प्रवाशांमधून होत आहे. याचा राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालयाने गांभीर्याने विचार करावा, हीच प्रवाशांची अपेक्षा आहे.
कोल्हापूर येथे कुडाळमार्गे जाण्यासाठी सकाळीच साडेपाच किंवा सहा वाजण्याच्या सुमारास बसफेरी असावी, अशी मागणी आहे.
सावंतवाडी आगाराची सकाळची कुडाळमार्गे कोल्हापूर बसफेरी नाही. वेंगुर्ले आगारातून पहाटे साडेपाच वाजता वेंगुर्ले -कोल्हापूर ही बस कुडाळमार्गे सोडण्यात येत होती. ही बस सकाळी सहा वाजेपर्यंत येथील बसस्थानकावर यायची. वेंगुर्ले ते कुडाळ मार्गावरील प्रवाशांसाठी ही फेरी सोयीस्कर होती. वेतोरे हायस्कूलमध्ये सकाळीच येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा व्हायचा. परंतु दहा वर्षांपासून ही बसफेरी बंद करण्यात आली. वेंगुर्ले येथून कुडाळमार्गे कणकवली-गगनबावडामार्गे कोल्हापूर अशी ही बसफेरी बंद करून सावंतवाडी-आंबोली आजरामार्गे कोल्हापूर अशी बसफेरी सुरू करण्यात आली कोल्हापूर येथे जाण्यासाठी सकाळी लवकर पहिल्या बसने प्रवास करायचा असेल, तर कुडाळ तालुक्यातील प्रवाशांना सावंतवाडी आगारात जावे लागते.
कुडाळ आगारातून सकाळी साडेसहा वाजता कुडाळ-विजापूर बसफेरी सुरू आहे. परंतु ती वेळेत सुटेल, याची शाश्वती नाही. कुडाळ येथून सकाळी लवकर कोल्हापूर येथे जाण्यासाठी बस नसल्याने येथील प्रवाशांची गैरसोय होत आहे.
वेंगुर्ले- कोल्हापूर बसफेरी कुडाळमार्गे पुन्हा सुरू करावी किंवा सावंतवाडी-कुडाळमार्गे कोल्हापूर बसफेरी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
या बसफेरीमुळे सकाळीच सावंतवाडी ते कुडाळदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही फायदा होणार आहे. कुडाळमार्गे कोल्हापूर बसफेरी सुरू करण्यासाठी विभागीय नियंत्रक (कणकवली) यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. तसेच लोकप्रतिनिधींनी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाशी चर्चा करून आपल्या स्तरावरून प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

