सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक संघाची स्थापना..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०५: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पर्यटनाशी संबंधित व्यावसाधिकामध्ये समन्वय साधून अखंड जिल्ह्यात पर्यटनाशी साखळी निर्माण होण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाची स्थापना करण्यात आली या महासंघाच्या अध्यक्षपदी विष्णू तथा बाबा मोंडकर, कार्याध्यक्षपदी सतीश पाटणकर, सचिवपदी नकुल पार्सेकर आणि खजिनदार पदी गुरुनाथ राणे यांची एकमताने निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी कमलेश चव्हाण (मालवण ), बाळू देसाई (वेंगर्ला ) डी.के. सावंत ( सार्वतवाडी ), संतोष काकडे (कणकवली ), सुधीर नकाशे (वैभववाडी ) दयानंद चौधरी (कुडाळ) संजय सावंत ( दोडामार्ग) यांची निवड करण्यात आली. सोशल मिडिया प्रमुख म्हणून किशोर दाभोलकर काम पहाणार आहेत. रोहीत आमने, दिनानाथ बांदेकर सहमचिव असतील. संचालक म्हणून प्रशांत प्रभू खानोलकर तर सल्लागार म्हणून बी.आर, वायंगणकर राहणार आहेत .
एक पर्यटक जेव्हा जिल्ह्यात येतो त्यावेळी तो जिल्ह्यातील किमान दहा व्यवसायाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार पुरवित असतो. हे नज़रेसमोर ठेऊन पर्यटनारशी संबंधित हॉटेल लॉजिंग, होम टे, भाजी-फळ विक्रेते , उद्योजक, तसेच विविध व्यवसाय करणाऱ्या सर्वनाच न्याय मिळावा या हेतूने महासंघाची निर्मिती करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोकरी करणारे सोडून सर्व व्यावसायिकांनी महासंघाचे सभासदत्व स्वीकारण्याचे आवाहन यावेळी अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले.
या बैठकीत जिल्हास्तरावर सुंदर पर्यटन पुस्तिका तसेच तालुकास्तरावर समित्या नियुक्त करण्याचे ठरले. या बैठकीत जिस्ह्यात पर्यटन वाडीसंदर्भात डी.के. टुरीझमचे डी.के. सावंत यांनी मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग पर्यटन वेबसाईट तसेच जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांची फलकाव्दारे माहिती त्या त्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी लावण्याची सूचना सतीश पाटणकर यांनी केली व ती मान्य करण्यात आली.
जिल्ह्यात आलेला पर्यटक किमान तीन दिवस जिल्ह्यात वास्तव्य करेल यादृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली तारकर्ली येथे आयोजित केलेल्या या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या बैठकीस विनोद रेडकर , बाबल्या वाडकर गोबिंद केळुसकर , कमलेश सर्फमित्र प्रशांत प्रभू खानोलकर आदी उपस्थित होते. यापुढील बैठक दि . ११ फेब्रुवारी २०२१ रोजी बेंगुर्ला सागरेश्वर येथे होणार आहे. तरी पर्यटक व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आहे.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_