पंचप्राण योग शाळेचे ५ दिवसीय योग शिबिर जल्लोषात सुरू – दोन दिवस यशस्वीपणे पूर्ण
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
मूळवंदवाडी (गुरववाडी) : पंचप्राण योग शाळा, आबोली यांच्या वतीने आयोजित ५ दिवसीय योग व आरोग्य शिबिरास २ मेपासून उत्साही सुरुवात झाली असून, यामधील पहिले दोन दिवस यशस्वीपणे पार पडले आहेत. शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या शिबिरात योग शिक्षक एकनाथ गुरव, भरत गावडे, कुनाल गावडे, अक्षय गुरव, प्रशांत गुरव व प्रियांका गुरव हे मार्गदर्शन करत आहेत. योगासने, प्राणायाम, योग थेरपी व सात्त्विक जीवनशैली यावरील उपयुक्त सत्रांमुळे सहभागी साधकांना मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अनमोल अनुभव मिळत आहे.
या शिबिराचा विशेष लाभ मधुमेह (डायबेटीस), सांधेदुखी, रक्तदाब (ब्लड प्रेशर), पोटाचे विकार, श्वसनाच्या तक्रारी, मानसिक तणाव अशा अनेक समस्यांवर होतो आहे. नियमित योगसाधनेतून शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि एक समतोल जीवनशैली घडवण्यास मदत होते.
शिबिर ६ मेपर्यंत दररोज सकाळी ६:०० ते ८:०० या वेळेत आबोली, मूळवंदवाडी (गुरववाडी) येथे आयोजित करण्यात आले आहे.
उरलेल्या तीन दिवसांत सर्व ग्रामस्थांनी या आरोग्यदायी उपक्रमाचा लाभ घ्यावा, ही विनंती.

