कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुगर्जना चषक क्रिकेट स्पर्धेत ओम साई स्पोर्ट्स संघ विजेता.

*🛑सिंधुगर्जना चषक क्रिकेट स्पर्धेत ओम साई स्पोर्ट्स संघ विजेता.*

 

*🛑सिंधुगर्जना ढोलताशा पथक आयोजित सिंधुगर्जना चषक २०२५ क्रिकेट स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १३:-* एन. बी. एस. चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोलताशा-पथक आयोजित सिंधुगर्जना चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना ओम साई स्पोर्ट्स संघ विरुद्ध अनुरी वॉरियर्स संघ यांच्यात झाला. यात ओम साई स्पोर्ट्स संघाने अनुरी वॉरियर्स संघाचा पराभव करीत सिंधुगर्जना चषक २०२५ वर नावकोरले. अनुरी वॉरियर्स संघाला उपविजेतापदावर समाधान मानावे लागले.

एन. बी. एस. चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधूगर्जना ढोलताशा पथक आयोजित सिंधुगर्जना चषक २०२५ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कणकवली येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत पाच संघांनी सहभाग घेतला होता. ही क्रिकेट स्पर्धा ब्राह्मणदेव मंदिर कनकनगर येथील मैदानात झाली. या स्पर्धेत सर्व खेळाडू हे सिंधुगर्जना पथकातील वादक होते, प्रत्येक संघात मुलींचा समावेशदेखील होता. रामेश्वर सुपर स्ट्रायकर्स संघमालक कृष्णराज सातवसे, स्वयंभू रवळनाथ संघमालक जोगेश राणे, ओम साई स्पोर्ट्स संघमालक तनोज मालंडकर, अनुरी वॉरियर्स संघमालक अनुजा भिसे, डी. एस. स्वराज संघमालक सुमंगल सावंत यांचे संघ होते. आयपीएल प्रमाणेच लिलाव प्रक्रियेने सर्व खेळाडूंची निवड ही संघामध्ये करण्यात आली.

शनिवार व रविवार २ दिवस ही स्पर्धा खेळवण्यात आली. चैतन्य निग्रे हा मालिकावीर ठरला. उत्कृष्ट फलंदाज प्रज्ञेश निग्रे, गोलंदाज तेजस चव्हाण हे खेळाडू ठरले. मुलींमध्ये उत्कृष्ट फलंदाज नेहा भोसले गोलंदाज दिव्या कुºहाडे या खेळाडू ठरल्या. पंच म्हणून वैभव म्हापसेकर, रोहित म्हापसेकर, तन्मय सरुडकर व सिद्धिविनायक पारगावकर यांनी काम पाहिले. स्पधेर्चे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे, रामेश्वर सुपर स्ट्रायकर्स संघमालक कृष्णराज सातवसे, सिंधुगर्जनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. हरिभाऊ भिसे, अध्यक्षा सुरेखा भिसे, कार्याध्यक्ष सर्वेश भिसे, ओम साई स्पोर्ट्स संघाचे संघमालक तनोज मालंडकर, कल्पेश महाडेश्वर, अनुजा ऋषिकेश भिसे यांच्या अनुरी स्पोर्ट्स संघातर्फे तुषार म्हापसेकर, शुभम पवार, अनंत सरंगले, जोगेश राणे यांच्या स्वयंभू रवळनाथ संघातर्फे कुणाल राणे उपस्थित होते. यावेळी गुढीपाडवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रातील वेशभूषा स्पधेर्तील विजेत्या साक्षी येंडे, सुमन सोनम, मिनल साबळे, नेहा भोसले, दिव्या कुºहाडे यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी जयवंत सातवसे, पथकप्रमुख नितीन चव्हाण, उपप्रमुख प्रज्ञेश निग्रे, महिला उपप्रमुख मिनल साबळे व पथकातील सर्व पदाधिकारी, खेळाडू उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!