कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑गुणवंत कामगारांना एसटीमध्ये सवलत द्या!

*🛑गुणवंत कामगारांना एसटीमध्ये सवलत द्या!*

 

*🛑राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष साटम यांची मागणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*कणकवली, दि- 13:-* राज्य सरकारच्या इतर विभागाच्या पुरस्कारर्थीना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवासात सवलत दिली जाते. मात्र, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गुणवंत पुरस्कार प्राप्त पुरस्कारर्थीना आज अखेर कोणताही लाभ दिला जात नाही ही बाब संबंधित पुरस्कारर्थीवर अन्यायकारक आहे त्यामुळे कामगारमंत्री आकाश फुंडकर व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी गुणवंत कामगारांना न्याय दिला पाहिजे, अशी मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशन सिधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दिलीप साटम यांनी राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्य शासनाच्या कामगार विभागातर्फे सामाजिक, शैक्षणिक,साहित्यिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा, संघटना तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी भरीव कामगिरी करणाऱ्या नोंदीत कामगारांना ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते हा कार्यक्रम राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगारमंत्री, कामगार राज्यमंत्री, केद्रीयमंत्री, आमदार, खासदार, संचालक मंडळ तसेच प्रमुख प्रशासकीय आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतो. हा भव्य-दिव्य शानदार सोहळा म्हणजे, संबंधित कामगारांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. राज्य सरकारच्या इतर विभागातर्फे अण्णाभाऊ साठे पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार, महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार आदींना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवासात सवलत दिली जाते. मात्र, महाराष्ट्र कामगार कल्याण मडळाच्या पुरस्कारर्थांना आज अखेर कोणताही लाभ दिला जात नाही.विश्वकर्मा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त पुरस्कारर्थांना हा लाभमिळावा, यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे योजना स्वरुपात हा प्रस्ताव कल्याण आयुक्तांच्या माध्यमातून प्रधान सचिव कामगारांना सादर करण्यात आला होता. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी तो प्रस्ताव कामगारमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे. ज्यायोगे राज्य सरकारवर कोणताही आर्थिक बोजा पडत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्रालयीन भेटीत याबाबतीत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे, असे साटम यांनी केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!