आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आता टी.जे.एस.बी. बँकेमध्ये होणार विलीन

🛑 आज होणार विलीनीकरणाचा सोहळा आणि टी.जे.एस.बी. बँकेच्या १५० व्या शाखेचे उद्घाटन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१३:– सावंतवाडी शहराच्या सहकार क्षेत्राची तब्बल ७८ वर्षे ओळख असलेली आणि सावंतवाडीकरांना अविरत सेवा देणारी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आता टी.जे.एस.बी. बँकेमध्ये विलीन झाली आहे. आज मंगळवार दि. १३ मे रोजी सकाळी ११ वाजता या विलीनीकरणाचा सोहळा आणि टी.जे.एस.बी. बँकेच्या १५० व्या शाखेचे उद्घाटन सावंतवाडी येथे थाटामाटात संपन्न होणार आहे.

सावंतवाडी अर्बन बँक ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित सहकारी संस्था होती. तिचे कार्यक्षेत्र केवळ सावंतवाडीपुरते मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यात पसरलेले होते. शहरातील व्यापारी वर्गासाठी ही बँक एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ होती, अनेक व्यक्तींना यामुळे रोजगार प्राप्त झाला होता. या बँकेने वर्षानुवर्षे स्थाwनिक अर्थव्यवस्थेत आणि समाजजीवनात मोलाची भूमिका बजावली आहे.

टी.जे.एस.बी. बँक गेल्या ५३ वर्षांपासून बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या बँकेच्या देशभरात १४९ शाखा कार्यरत असून, सावंतवाडी येथे सुरू होणारी ही शाखा बँकेची १५० वी शाखा ठरणार आहे. सावंतवाडी येथे शाखा विस्तार करून, टी.जे.एस.बी. बँक या परिसरातील ग्राहकांना आधुनिक आणि विस्तृत बँकिंग सेवा पुरवणार आहे.

या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सहकार क्षेत्रातील हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, उपाध्यक्ष वैभव सिंगवी, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर तसेच सर्व संचालक मंडळाने केले आहे.या विलीनीकरणामुळे सावंतवाडी अर्बन बँकेच्या ग्राहकांना आता टी.जे.एस.बी. बँकेच्या विस्तृत सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभघेता येणार आहे. ७८ वर्षांच्या एका गौरवशाली परंपरेचा सन्मानपूर्वक समारोप होऊन एका नव्या युगाची सुरुवात या निमित्ताने होत आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!