🛑सिंधुदुर्गातील पाणथळ जागांसाठी प्लास्टिकमुक्त स्वच्छता मोहीम.
*🛑सिंधुदुर्गातील पाणथळ जागांसाठी प्लास्टिकमुक्त स्वच्छता मोहीम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि- ०५:-* जैवविविधतेने समृद्ध सिंधुदुर्गात आढळणाऱ्या एकूण पाणथळ संख्या व जैवविविधतेमुळे हा जिल्हा ‘लैंड ऑफ वेटलैंड’ म्हणून ओळखला जातो. वाढत्या प्रदुषणामुळे येथील जैवविविधतेस धोका निर्माण होऊ लागला आहे. पर्यावरण आणि जैवविविधतेच्या रक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या महाराष्ट्र जनुकीय कोष प्रकल्पाअंतर्गत संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, वन विभाग सावंतवाडी, देशपांडे फाऊंडेशन, वनशक्ती, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग व तरुण भारत, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील जागतिक वारसास्थळ लाभलेले धामापूर तलाव तसेच पेंडूर, वालावल, नेरूर, पाट, पाळणकोंड, निशाण, दाबाचीवाडी, ओसरगाव व ओझरम तलाव अशा दहा निवडक पाणथळ जागांमध्ये आढळणारा प्लास्टिकसह इतर कचरा साफ करून पाणथळ जागा कचरामुक्त करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम ४ मे पासून पाट तलावातून सुरू करण्यात आली. ११ मे रोजी दाबाचीवाडी, १२ मे रोजी वालावल, १८ मे-धामापूर, २५ में नेरूर-ठाकुरवाडी, २६ मे-पेंडूर, ३० मे-ओझरम, १ जून-पाळणकोंड, ३ जून-निशाण, ४ जून-ओसरगाव याठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमामध्ये विद्यार्थी, ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवी संस्था, स्थानिक नागरिक तसेच प्रशासकीय अधिकारी यांनी सहभाग घ्यावा आपापल्या परीने सहभागी होऊन या मोहिमेस हातभार लावावा. पाणथळ जागांचे सौंदर्य आणि पर्यावरणीय महत्त्व टिकविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘निसर्गाचे रक्षण हीच खरी सेवा’ ही भावना मनात रुजवून प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्गसाठी एक पाऊल पुढे यावे. अधिक माहिती किंवा सहभागी होण्यासाठी डॉ. योगेश कोळी (९४२१२२४८००), प्रविण सावंत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

