कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑प्रा.रश्मी काजरेकर यांना राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार

*🛑प्रा.रश्मी काजरेकर यांना राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- ०१:-* बांदा येथील गोगटे-वाळके कॉलेज,बांदाच्या अर्थशास्त्र विभाग प्रमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. रश्मी मेघश्याम काजरेकर यांना इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी,बेळगाव (कर्नाटक राज्य) व रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन,बेळगाव या संस्थेच्यावतीने राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार नुकताच गोवा येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

प्राध्यापिका रश्मी काजरेकर या गेली 30 वर्षे गोगटे –वाळके कॉलेज, बांदा येथे कार्यरत आहेत.एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापिका म्हणून त्यांचा लौकिक आहे.अर्थशास्त्र विभाग प्रमुख पदाबरोबरच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या त्या कित्येक वर्षे कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत युवा पिढीमध्ये विविध उपक्रम राबवून त्याच्यात नेतृत्वगुण विकसित करण्यात व राष्ट्रीय कार्यात युवकांना सज्ज करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. या विभागामार्फत त्यांनी ग्रामीण भागात समाजाभिमुख अनेक उपक्रम राबविले आहेत. समाज जागृती अंतर्गत पथनाट्य, शासनाच्या अनेक योजना तळागाळात, ग्रामीण पातळीवर पोहचविण्यात त्याचा वाटा आहे.तसेच त्यांनी महिला विकास कक्षाच्यामार्फत युवतींच्या, महिलांसाठी आरोग्य शिबिरे, समाजातील गरजू , आजारी महिलाना आर्थिक मदत करणे,कोरोना कालखंडात गरीब आर्थिक व कपडे इतर वस्तूंच्या माध्यमातून हातभार लावत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.त्या स्वतः एका गरीब कौटुंबिक पार्श्वभूमीतून आल्यामुळे त्यांनी आतापर्यंत काॅलेजमधील अनेक गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी आर्थिक मदत दिली आहे.त्या कोलगाव ता.सावंतवाडी येथे सक्षम सरपंच म्हणून कार्यरत होत्या.सदर गावात शासनाच्या अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे.त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन सदर संस्थेने त्यांना नुकतेच सन्मानित केले आहे.सन्मानचिन्ह, मानाचा फेटा, सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.त्यांच्या याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ मंडळाचे अध्यक्ष डी.बी.वारंग,उपाध्यक्ष प्रमोद कामत, सचिव एस.आर.सावंत व सर्व पदाधिकारी , प्राचार्य डाॅ.गोविंद काजरेकर, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!