🛑धाकोरे येथील चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद
*🛑धाकोरे येथील चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद*
*🛑जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक-रुपेश राऊळ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- २९:-* श्री देव काळोबा मित्रमंडळ आणि शाळा आजगाव (वसवाचे तळे) ता. सावंतवाडी, यांच्या संयुक्त विद्यमाने धाकोरे गावमर्यादित चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली.
स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमात प्रथम दीपप्रज्वलन करून देवी सरस्वती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे मंडळाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख श्री रुपेश राऊळ ,धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक ,उपसरपंच रामचंद्र गवस, रोहन मल्हार, अर्जुन पालव, माजी पंचायत समिती सदस्या मनीषा गोवेकर महादेव कापडी, प्रभाकर गावडे ,रामदास गावडे, दत्तात्रय गावडे,लक्ष्मण परब सुभाष गावडे अनिकेत कापडी ,पोलीस पाटील धाकोरे -श्रीराम प्रभू राळकर, राजश्री गावडे लक्ष्मी पालव ,स्वाती पालव, सायली गावडे प्रवीण पालव देविका गोवेकर पूजा कोठावळे, प्रियांका आजगावकर मुख्याध्यापिका धाकोरे शाळा नंबर- १,शिक्षिका प्रविणा भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, चषक,प्रमाणपत्र देण्यात आले.
चित्रकला स्पर्धेचा निकाल:-लहान गट – पहिली व दुसरी
१) हंसराज पवार, २) वेदिका गावडे, ३) दित्या मुळीक
इयत्ता ३ री व ४थी गट :-
१) परिधी सावंत, २) लावण्या प्रभू राळकर, ३) दत्तराज मुळीक
इयत्ता ५ वी व ७ वी गट:-
१) राज गावडे, २) आर्या धाकोरकर,३) सोनल मुळीक.
कार्यक्रमात बोलताना, श्री रुपेश राऊळ यांनी मुलांच्या कलेची प्रशंसा करून ,मुलांनी रंगविलेली चित्र पाहून भारावून गेल्याचे सांगितले .यावेळी उपस्थित मुलांना पालकांना संबोधित करताना सांगितले की,मुलांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे.जेणेकरून त्यांना आपल्या जीवनात योग्य दिशेने वाटचाल करता येईल.पालकांनी सुद्धा मुलांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.मुलांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना करियर करायला प्रोत्साहन दिले पाहिजे.प्रत्येकाकडे काहीना काही कला आहे.त्या कलेचा योग्य तो उपयोग केल्यास , कलेला योग्य मार्गदर्शन लाभले तर कुठलाच विद्यार्थी मागे राहणार नाही. श्री काळोबा मित्र मंडळ यांनी गावातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करून त्यांना योग्य असे व्यासपीठ दिले.त्यांचे कौतुक करताना,आपण या मंडळाला,शाळेला,होईल ती मदत करणार असल्याचे सांगून स्पर्धेतील विजेत्यांच अभिनंदन केलं.
स्पर्धेतील सर्वच सहभागी स्पर्धकांनी एकापेक्षा एक अशी सरस चित्र काढून रंगविली व उपस्थितांची वाहवा मिळवली.
या स्पर्धेतील बक्षीसांसाठी श्री बाबुराव धुरी (जिल्हाप्रमुख शिवसेना ),श्री गौरेश सावंत – माजगाव ,सागर नाणोसकर, एकनाथ मुळीक ,डॉक्टर प्रमोद नाईक, यांनी पुरस्कृत करून मंडळाला सहकार्य केले.मंडळाला नेहमी सहकार्य करणारे शाळेतील शिक्षक श्री अर्जुन रणशूर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी, श्री विष्णू परब, श्री सुंदर गावडे, सागर गावडे, रुपेश गावडे ,राहुल गावडे ,सचिन परब ,संदीप गावडे, स्वाती पालव ,सौ .गवस ,सौ.मुळीक आनंद गावडे तसेच विद्यार्थी पालक व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री अर्जुन रणशूर तर आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष व धाकोरे ग्राम पंचायत सदस्य प्रविण पालव यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून शिक्षिका प्रियांका आजगावकर, प्रणिता भगत यांनी काम पाहिले.उपस्थित सर्वच मान्यवरांनी श्री देव काळोबा मंडळाच्या एकजुटीचे कौतुक करून या मंडळाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

