🛑जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून 30 तारखेला सिंधुदुर्गात गुंतवणूक परिषद.
*🛑जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून 30 तारखेला सिंधुदुर्गात गुंतवणूक परिषद.*
*🛑गुंतवणूक परिषदेत उद्योजकाने मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे जिल्हाधिकारी अनिल पाटील.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- २९:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग व्यवसायास पूरक वातावरण असून पायाभूत सोयी सुविधा, कुशल मनुष्यबळाची मोठी उपलब्धता आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरण पुरक आणि कृषि आधारित जास्तीत जास्त उद्योग आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर 30 एप्रिल रोजी गुंतवणूकदारांची परिषद होणार आहे. या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून या परिषदेस अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, श्री पत्की उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की सन २०२४ मध्ये जिल्हा गुंतवणूक परिषद मध्ये ४४६.७४ कोटी रूपयांचे एकूण ९१ सामंजस्य करार झाले असून त्याद्वारे १८६७ रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. या कराराची सद्यस्थिती पहाता ४ प्रस्ताव (१२.७७ कोटी रुपये ) रद्द करण्यात येणार असल्याचे कळविले आहे.१४ प्रस्ताव मध्ये जागेचा ताबा मिळवला असून ९ प्रस्ताव विविध मंजुरी मिळणे साठीचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. उर्वरित ६४ प्रस्ताव १९१.२९ कोटी गुंतवणूक १३९६ रोजगार निर्मितीचे कार्यरत झाले आहेत. सन २०२५ मधील कोंकण विभागीय गुंतवणूक परिषद १२ मार्च रोजी ठाणे येथे झाली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३ सामंजस्य करार ( रुपये ३८२.९१ कोटीं) झाले असून त्याद्वारे ८७२ रोजगार निर्मिती झाले. प्रस्तावित परिषदे मध्ये आणखी ३० सामंजस्य करार होणार असून त्यामध्ये एकूण २५३.०२ कोटी गुंतवणूक व ८४० रोजगार निर्मिती होणार आहे. सदर वर्षीं एकूण ७३ सामंजस्य करार ६३५.९३ कोटी व १७१२ रोजगार निर्मिती होणार आहे. या शिवाय आणखी येऊ शकणाऱ्यां गुंतवणूकीचे स्वागत असून ती यादीत समाविष्ट करण्यात येतील असेही ते म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

