🛑 कुणकेरी शाळा नं २ चे विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये उज्वल यश
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२८:- कुणकेरी शाळा नं २ च्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन करीत गौरवशाली यशाची परंपरा कायम राखली आहे.
या शाळेतील आराध्या बापू झोरे (इ ३ री) या विद्यार्थिनीने एसटीएस परीक्षेत १७४ गुण मिळवित गोल्ड मेडल पटकावताना तालुक्यात ६ वा तर जिल्ह्यात २६ गा क्रमांक पटकाविला. तसेच ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये ९० मिळवताना ब्राँझ मेडल पटकावले. तर गुरुकुल परीक्षेत २१६ गुण जिल्ह्यात १७ वा तर राज्यात ३४ वा क्रमांक पटकावला. आर्यन बाबू झोरे (इ१ ली) याने ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये ९० गुण मिळवीत सिल्वर मेडल तर गुरुकुल परीक्षेत ८८ गुण मिळवीत जिल्ह्यात २ रा क्रमांक तर राज्यात ७ वा क्रमांक पटकाविला. तसेच सार्थक रामदास झोरे (इ ४ थी) याने एपीजे अब्दुल कलाम परीक्षेत १७० गुण तर ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये ५२ गुण आणि सौम्या रामदास झोरे (इ २री ) हिने ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये ५२ गुण तर एसटीएस परीक्षेत ७६ गुण मिळवित उज्वल यश संपादन केले.
तसेच या शाळेतील आराध्या झोरे व आर्यन झोरे या विद्यार्थ्यांनी अबॅकस परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर उज्वल यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नागेश गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. सावंतवाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कल्पना बोडके यांनी या विद्यार्थ्यांचे खास शाळेमध्ये जात अभिनंदन केले. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे कुणकेरी सरपंच सोनिया सावंत, उपसरपंच सुनिल परब, ग्रामपंचायत सदस्य भगवान सावंत, अंकिता सावंत, केंद्रप्रमुख म ल देसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा ऋतुजा झोरे, उपाध्यक्ष बाबू झोरे, निकिता परब, सूर्यकांत सावंत, राजन मडवळ, लक्ष्मण सावंत, महादेव गावडे, नाना गावडे यांच्यासह पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

