आणखीकोकण

सावंतवाडीतील ज्येष्ठ डॉ.श्रीपाद जनार्दन कशाळीकर यांचं निधन

 

 

सावंतवाडी शहरात सालईवाडा भागात अनेक वर्षे रुग्णांना सेवा देणारे येथील ज्येष्ठ डॉ.श्रीपाद जनार्दन कशाळीकर यांचे आज दुपारी माठेवाडा येथील राहत्या घरी निधन झाले.

ते ८९ वर्षाचे होते.ज्येष्ठ डॉ.श्रीपाद जनार्दन कशाळीकर हे गेली अनेक वर्षे सावंतवाडी शहरात सालईवाडा भागात डॉक्टर म्हणून सेवा करत होते, गुणकारी डॉक्टर म्हणून ते परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कशाळीकर मेडिकलचे मालक मकरंद आणि अनिरुद्ध तर डॉ. सुबोधन कशाळीकर यांचे ते वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!