महामार्गालगतच्या जि.प. बांधकामच्या जागेतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्थलांतर होईल; शिवसेना नेते संदेश पारकर
▪️हायवे समस्या सुटल्याखेरीज उड्डाणपूल सुरू करून देणार नाही; पारकर यांचा इशारा
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : कणकवली
🎴कणकवली,दि.०४: महामार्गालगतच्या जिल्हा परिषद बांधकामच्या जागेतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्थलांतर होईल. तसेच कणकवली शहरातील हायवेच्या समस्या सुटल्याखेरीज उड्डाणपुलावरून आम्ही वाहतूक सुरू करू देणार नाही. असा इशारा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आज दिला.
श्री.पारकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, महामार्गावरील तेलीआळी चौकातील छत्रपतींचा पुतळा हलवून तो गटारावर बसविण्यासाठी हायवे ठेकेदाराने धावपळ सुरू केली होती. मात्र आम्ही तो प्रयत्न हाणून पाडला. आम्हाला छत्रपतींचे भव्यदिव्य स्मारक करायचे आहे. त्यासाठी महामार्गालगत जिल्हा परिषदेची जागा उपलब्ध आहे. तेथील इमारतीचे निर्लेखन झाल्यानंतर ही जागा पुतळ्यासाठी उपलब्ध होईल. या प्रक्रिये दरम्यान एक दोन शिवजयंती झाली तरी चालेल. पण आम्ही गटारावर पुतळ्याचे स्थलांतर करू देणार नाही.
पारकर म्हणाले, छत्रपतींच्या पुतळ्यासाठी जिल्हा परिषद बांधकामची जागा निश्चित झाली आहे. तर पालकमंत्री व खासदार यांनी या स्मारकाच्या निधीची तरतूदही केली आहे. याखेरीज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बांधकाम विभागाचे कार्यालय निर्लेखन करण्यास मान्यता मिळविण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांनी घेतली आहे. छत्रपतींच्या पुतळ्याच्या स्थलांतरणानंतर तेथे स्मारक उभारणीसाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या स्मारकाजवळ छत्रपतींची शौर्यगाथा व भव्य स्मारक करत तेथे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बांधकाम विभागाची इमारत निर्लेखन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीदेखील मान्यता दिल्याची माहिती पारकर यांनी दिली.
पारकर म्हणाले, शहरातील उड्डाणपूल पूर्ण झाल्याने त्यावरून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन हायवे कडून सुरू आहे. मात्र शहरात हायवेच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. अनेकांना अजून मोबदला मिळालेला नाही. तसेच आरओडब्ल्यू लाइन देखील निश्चित झालेली नाही. त्यामुळे शहरातील हायवेच्या समस्या सुटल्याखेरीज आम्ही उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करू देणार नाही.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

