कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सेवानिवृत्त शिक्षकांना उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देणार नाही . मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर

*🛑सेवानिवृत्त शिक्षकांना उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देणार नाही . मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २५:-* शिक्षकांच्या संस्कारामुळेच आम्ही घडलो . सुसंस्कारित झालो आणि आज उच्च पदावर काम करीत आहोत . याचे श्रेय शिक्षकानी केलेल्या चांगल्या संस्कारालाच जाते . अशा माझ्या शिक्षकांना सेवानिवृत्तनंतर त्यांना मिळणाऱ्या हक्काच्या लाभासाठी उपोषणाला बसावे लागत असेल तर मी ते होऊ देणार नाही . मी माझ्या कारकिर्दीत सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न तात्काळ सोडविणार असे आश्वासन मान . मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सिं जि सेवा निवृत्त प्राथ शिक्षक असोशिएशनच्या पदाधिकारी यांना दिले .

सिंधुदूर्ग जिल्हा सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष मान . सावळाराम अणावकर यांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बाबत मान . जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग , मा . मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग , मान . शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) सिधुदुर्ग , तसेच सर्व तालुका पंचायत समिती गटविकासअधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना 20 मार्चच्या पत्राने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबतचे निवेदन दिले होते . सदरचे प्रश्न सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन 30 एप्रिल पर्यंत सोडविले न गेल्यास १ मे रोजी जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण तर १५ मे ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले होते . मान . मुख्यकार्य अधिकारी यांना निवेदन प्राप्त होतात त्यांनी सिंधुदुर्ग सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षण असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची आपल्या दालनात नुकतीच बैठक आयोजित केली होती . त्यावेळी ते बोलत होते .यावेळी त्यांचे दालनात मान . शिक्षणाधिकारी गणपती कमलकर साहेब, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे साहेब, सावंतवाडी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके मॅडम , कुडाळ पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर साहेब, वेंगुर्ला तालुका पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी साहेब ,दोडामार्ग तालुका पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे , देवगड तालुका गटशिक्षणाधिकारी नदाफ साहेब, शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक स्नेहा कांबळी , मनस्वी मुसळे , विनोद राणे सहाय्यक लेखाधिकारी , सत्यवान सावंत , लक्ष्मण डोईफोडे कनिष्ठ प्रशासन अधिकारी ओरोस आदी अधिकारी उपस्थित होते .

यावेळी असोशिएशनने दिलेल्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा मान . रवींद्र खेडकर साहेब यांनी केली . यामध्ये दर महिन्याच्या पाच तारीख पर्यंत निवृत्ती वेतन अदा करणे, निवड श्रेणीच्या प्रस्तावातील तृटी पूर्ण करून शिक्षकांना लाभ मिळून देणे, जिल्हा तसेच राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढ मंजूर करणे, गटविम्याचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करणे, संगणक प्रशिक्षण पूर्ण नाही म्हणून कपात केलेली रक्कम शासनाच्या मार्गदर्शनानंतर अदा करणे, निवृत्त शिक्षकांची भविष्य निर्वाह निधीची रक्क्म मंजूर करणे, 30 जूनला निवृत्त झालेल्या शिक्षकांना एक जुलैची काल्पनिक वेतन वाढीचे प्रस्ताव मंजूर करणे, आदी प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली .यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दळवी, नारायण सावंत , जिल्हा सचिव सुंदर पारकर, कणकवली तालुका अध्यक्ष चंद्रकांत तेली, मालवण तालुकाध्यक्ष विजय चौकेकर ,वेंगुर्ला तालुका अध्यक्ष झिलू गोसावी,देवगड तालुकाध्यक्ष मधुकर राणे ,सावंतवाडी सचिव रामनाथ राऊळ, कणकवली सचिव अनिलकुमार मालवदे, वेंगुर्ला सचिव विठ्ठल कदम , विजय देसाई , म ल देसाई, सविता मूननकर आदी असोसिएशनचे जिल्हा तालुका पदाधिकारी उपस्थित होते .

*१मे ते धरणे आंदोलन व १५ मे चें उपोषण स्थगित**

सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक असोशिएशनने आपल्या निवेदनात दिलेल्या प्रश्नांची अपेक्षित कार्यवाही 30 एप्रिल पर्यंत न झाल्यास एक मे रोजी जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या कार्यालयासमोर एक दिवशी लाक्षणिक धरणे आंदोला व 15 मे रोजी मान . जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचे ठरविले होते . मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या दालनात असोसिएशनची भेट घेऊन सकारात्मक चर्चा करून सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविणार असे आश्वासन दिल्याने असोशिएशनने नियोजन आंदोलन व उपोषण स्थगित केल्याचे जाहीर केले आहे . मान . रवींद्र खेबुडकर साहेब यांनी असोसिएशन बरोबर सकारात्मक चर्चा करून प्राधान्याने सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न जास्तीत जास्त लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन देऊन तशी कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी ,सर्व गटशिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ लिपिक यांना दिल्याने सदरचे उपोषण व धरणेआंदोलन स्थगित केल्याचे असोशिएशनचे उपाध्यक्ष श्री प्रकाशभाई दळवी यांनी जाहीर केले . आणि मान मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे तसेच शिक्षणाधिकारी सर्व गटशिक्षणीयिकारी आणि उपस्थित वरिष्ठ लिपिक अधिकारी यांचे आभार मानले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!